Kolhapur District Bank : कोल्हापूर जिल्हा बँकेत २ कोटी ८६ लाखांचा कर्मचाऱ्यांनी केला गैरव्यवहार

KDCC Bank Fraud : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वारणानगर शाखेतील काही कर्मचाऱ्यांनी मोठा ‘गैरव्यवहार' केल्याची विश्‍वसनीय माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
KDCC Bank
KDCC Bankagrowon
Published on
Updated on

Kolhapur Jilha Bank : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वारणानगर शाखेतील काही कर्मचाऱ्यांनी मोठा ‘ढपला’ पाडल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंतच्या तपासणीत या शाखेत २ कोटी ८६ लाख रुपयांचा अपहार झाल्याची चर्चा आहे. मागच्या १० वर्षांपूर्वी डबघाईला आलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची वाटचाल आता सुरळीत होऊ लागली होती. परंतु काही विशिष्ट कर्मचाऱ्यांमुळे बँकेच्या लौकीकास गालबोट लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

पन्हाळा तालुक्यातच  बँकेच्या विविध शाखांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या एका बँक निरीक्षकसह शाखा व्यवस्थापक आणि क्लार्कने या करामती केल्या आहेत. या तिघांवरही बँकेच्या संचालकांचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे.  गेल्या दोन-तीन महिन्यांतील हा प्रकार आहे. त्याची चौकशी बँकेच्या पातळीवर सुरू असून, आतापर्यंतच्या चौकशीत या तिघांनी दोन कोटी ८६ लाख रुपयांचा ‘ढपला’ पाडल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अपहाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित तिघांनाही तत्काळ कामावर न येण्याचे आदेश दिल्याचे समजते. पहिल्यांदा पैसे भरा मग कामावर घ्यायचे का नाही ते ठरवू, असे तिघांना सांगण्यात आले आहे. परंतु निलंबन किंवा अन्य कारवाई झालेली नाही. या मागचे गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या जिवावर मोठ्या झालेल्या बँकेत असा प्रकार घडत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

असा पाडला ढपला

ज्या खातेदारांचे पगारच या शाखेत जमा होत नाहीत त्यांच्या नावे कर्ज उचलून पैसे उचलणे, मयत खातेदार किंवा गेली अनेक वर्षे बंद असलेल्या खात्यावरील रक्कम बनावट सहीने परस्पर काढून; तसेच ठेवीदारांची रक्कम त्यांच्या बनावट सह्या करून त्यावरील पैसे उचलून हा अपहार केल्याचे समजते. पगार नसताना शाखेत पगार जमा होत असल्याचे दाखवून २९ प्रकरणांत पैसे काढले गेले आहेत, तर सात-आठ बंद खात्यांवर बरेच दिवस व्यवहार झाला नसल्याने त्या खात्यावरील रक्कम उचलल्याची माहिती आहे.

KDCC Bank
KDCC Bank Kolhapur : साखर कारखाना कर्जात बुडाला, संचालकांना जिल्हा बँकेकडून थेट नोटीसा

बँकेवर २००९ साली अशाच चुकीच्या कारभारामुळे प्रशासक नियुक्तीची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर २०१५ मध्ये बँकेत पुन्हा संचालकराज सुरू झाले. त्यावेळी बँकेत संचालकांच्या नव्हे, तर प्रशासनाच्या मंजुरीशिवाय कोणत्याही कर्जाला मंजुरी देणार नसल्याचे श्री. मुश्रीफ यांनी जाहीर केले होते.

चुकीच्या व्यवहाराला लगाम घालण्याबरोबरच अपहारासारख्या प्रकरणात सहभागी कर्मचारी, अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यातून बँकेत दहा हजार कोटींच्या ठेवी जमा करण्याचे उद्धिष्ट ठेवून त्यांच्यासह संचालक मंडळ काम करत असतानाच, अशा काही मूठभर कर्मचाऱ्यांमुळे बँकेच्या वैभवाला गालबोट लागत आहे.

वादग्रस्त अधिकाऱ्यांची पाठराखण

या प्रकरणातील विभागीय अधिकाऱ्याने (डीओ) यापूर्वीही अनेक शाखांत अशा प्रकारचा गोंधळ घातला आहे; पण त्याच्यावर एका ज्येष्ठ संचालकाची मेहरनजर असल्याने व या संचालकांची श्री. मुश्रीफ यांच्याशी असलेली मैत्री त्याच्यावरील कारवाईच्या आड येत आहे. याही प्रकरणात तोच अधिकारी ‘कळीचा नारद’ असल्याचे समजते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com