Watermelon Crop agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Crop : जळगाव जिल्ह्यात खरीप कलिंगड लागवड कमी राहणार

Watermelon Crop Jalgaon : खानदेशात खरिपात कलिंगड लागवडीसंबंधी शेतकऱ्यांत फारसा उत्साह नाही. रब्बी हंगामात कलिंगडाला रोगराईचा फटका बसला. दरही कमी मिळाले.

Team Agrowon

Jalgaon Watermelon : खानदेशात खरिपात कलिंगड लागवडीसंबंधी शेतकऱ्यांत फारसा उत्साह नाही. रब्बी हंगामात कलिंगडाला रोगराईचा फटका बसला. दरही कमी मिळाले. यामुळे कलिंगड लागवड घटेल, असे दिसत आहे.

अजूनही खानदेशात उन्हाळ हंगामातील कलिंगडाची काढणी सुरू आहे. परंतु दर टिकून नाहीत. कमी दर असून, प्रतिकिलो सात ते नऊ रुपये दर जागेवर किंवा शिवार खरेदीत शेकऱ्यांना मिळत आहे. कलिंगडाची लागवड रब्बीत खानदेशात आठ हजार हेक्टरवर झाली होती. अधिक आवकेची समस्याही रब्बीत होती. पण आता खरिपात फारशी लागवड होणार नाही, असे दिसत आहे. लेट खरिपातही लागवड कमी राहील. कारण यंदा पाऊस अधिक येईल, असे सांगितले जात आहे.

मागील खरिपातही कलिंगड पिकात अतिपाऊस व किडींनी रोगराई आल्याने अतोनात हानी झाली. एक ते दीड महिन्याचे पीक फळे लगडल्याच्या काळात हातचे गेले. कलिंगडाचा एकरी खर्च ६५ ते ७० हजार रुपये आहे. एवढा खर्च अनेकांचा वाया गेला. यानंतर रब्बीत लागवड वाढली. पण रोगराई व कमी दर, अशी समस्या आहे. यामुळे अनेकांनी खरिपात लागवड टाळण्याचे नियोजन केले आहे.

लागवडीत ७० ते ८० टक्के घट शक्य

खानदेशात जुलै व ऑगस्टमध्ये खरिपातील लागवड केली जाते. तसेच लेट खरिपात सप्टेंबरमध्ये काहींची लागवड केली जाते. ही लेट किंवा उशिराची लागवड असते. खरिपातील लागवडीत जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील तळोदा व शहादा तालुका आघाडीवर असतो.

यंदा मात्र सर्वत्र लागवड घटणार आहे. मागील खरिपात सुमारे दीड हजार हेक्टरवर खरिपात कलिंगड होते. यंदा सुमारे २०० ते ३०० हेक्टरवर खरिपात कलिंगड पीक घेतले जाईल, असे सांगितले जात आहे. यामुळे बियाणे पुरवठादारांतही उत्साह कमी दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SBI Inflation Report : युद्ध आणि एल-निनोमुळे २०२६ मध्ये महागाई वाढेल; एसबीआयचा अहवाल

Global Transport System: हवाई, जल वाहतुकीची वैशिष्ट्ये

Farmer Training: कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांचे प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन

Farmer Crying Video Viral: शेतकरी बाजारात ढसाढसा रडला, 'व्हिडिओ व्हायरल'नंतर अधिकारी निलंबित

Chana Procurement: जालना जिल्ह्यात सहा केंद्रांवरून साडेसात हजार क्विंटल हरभरा खरेदी

SCROLL FOR NEXT