Agricultural Crops Damage Rain
Agricultural Crops Damage Rainagrowon

Agricultural Crops Damage Rain : अस्मानीच्या तडाख्यात शेतीमाल नुकसानीसह जीवितहानी

Nashik Rain : दररोज सरासरी २०० ते २५० हेक्टरवर नुकसान होत आहे. सोमवारी (ता. १९) जोरदार पावसामुळे जिल्ह्यात २०६ हेक्टर क्षेत्रावर दाणादाण उडाली आहे.
Published on

Pre-Monsoon Rains Nashik : यंदाचा मॉन्सूनपूर्व पाऊस शेतकऱ्यांसाठी मोठा हानिकारक ठरतो आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा मुक्काम असून आतापर्यंत जवळपास ६,००० हेक्टर क्षेत्रावर नुकसान आहे. दररोज सरासरी २०० ते २५० हेक्टरवर नुकसान होत आहे. सोमवारी (ता. १९) जोरदार पावसामुळे जिल्ह्यात २०६ हेक्टर क्षेत्रावर दाणादाण उडाली आहे. यामध्ये सिन्नर, निफाड, दिंडोरी, चांदवड तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे.

सोमवारी दुपारनंतर मॉन्सूनपूर्व पावसाने मालेगाव, सटाणा, नांदगाव, कळवण, दिंडोरी, पेठ, निफाड, येवला तालुक्यांत जोरदार हजेरी लावली. यामध्ये कांदा, टोमॅटो, डाळिंब व भाजीपाला पिकांचे नुकसान आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे घरावर पडल्याने मोठे नुकसान आहे. याशिवाय विजेचे खांब पडल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. दररोज दुपारनंतर सुरू होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सर्वाधिक ९६ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला, ५७ हेक्टर क्षेत्रावर कांदा, ५० हेक्टर क्षेत्रावर डाळिंब व २ हेक्टरवर आंबा पिकाचे नुकसान आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या प्राथमिक नुकसान अहवालावरून समोर आली आहे. तर काढणी झालेला व काढणीविना राहिलेला कांदा तसेच भाजीपाला शेतात खराब होत आहे.

Agricultural Crops Damage Rain
Kharif Planning Nashik : खरीपपूर्व आढावा बैठकीत कृषिमंत्री संतप्त

सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे ठकुबाई नामदेव दिघोळे यांच्या शेतातील शेडनेट कोसळून पडल्याने रंगीत ढोबळी मिरची लागवडीचे अतोनात नुकसान झाले आहे. तोडणीयोग्य पिवळी ढोबळी मिरची मातीमोल झाली आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची समोर आले आहे. तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, मंडल कृषी अधिकारी नितीन पगार, कृषी पर्यवेक्षक रणजीत आंधळे, तलाठी श्री. शिरसाठ यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला.

वीज पडल्याने जीवितहानी, वादळी वाऱ्याचा फटका

मौजे सुकेणे (ता. निफाड) येथील शेतकरी दीपक रंगनाथ रहाणे (वय ४०) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. जातेगाव (ता. जि. नाशिक) येथील आदित्य वळवे (वय १२) हा मुलगा वीज पडल्याने जखमी झाला. वडगाव पंगू (ता. चांदवड) येथे पोल्ट्री फार्मवर वीज पडल्याने अंदाजे २,००० कोंबड्या मृत झाल्या. तर देवळा तालुक्यातील दोधा शिंदे यांची गाई वीज पडून मरण पावली. भेंडाळी(ता. निफाड) येथे विष्णू खालकर यांच्या घरावर झाड पडल्याने नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com