Parbhani Kharip agrowon
ॲग्रो विशेष

Parbhani Kharip : परभणीत ५ लाख २३ हजार हेक्टरवर खरीप पेरणी प्रस्तावित

Parbhani Agriculture Department : गतवर्षीच्या (२०२४) तुलनेत यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात १४ हजार हेक्टरने घट तर कपाशीच्या लागवडीत ९ हजारांवर हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे.

sandeep Shirguppe

Parbhani Agriculture : जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२५) खरीप हंगामात विविध पिकांची ५ लाख २३ हजार २७३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. गतवर्षीच्या (२०२४) तुलनेत यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात १४ हजार हेक्टरने घट तर कपाशीच्या लागवडीत ९ हजारांवर हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी दिली.

परभणी जिल्ह्यात २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षांतील खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र ५ लाख १८ हजार ४६८ हेक्टर आहे. त्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख ५४ हजार ५४ हेक्टर, कपाशी १ लाख ९१ हजार ९५४ हेक्टर, तूर ४२ हजार ६०२ हेक्टर, मूग १७ हजार ६०० हेक्टर, उडीद ६ हजार ४१३ हेक्टर, ज्वारी ३ हजार ८५७ हेक्टर, बाजरी ४९९ हेक्टर, मका ९८३ हेक्टर, तीळ २०१ हेक्टर, कारळ ५९.१६ हेक्टर या पिकांचा समावेश आहे.

गतवर्षी (२०२४) खरिपात ५ लाख २७ हजार ९०१ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्या वेळी सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होता. त्यानंतर कपाशी, तूर, मूग, उडीद या पिकांचा क्रम होता. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली. गतवर्षी २ लाख ८० हजार ९०५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. परंतु विविध कारणांनी उत्पादकता घटली आहे. बाजारभावदेखील कमी झाले आहेत.

यंदा खरिपात जिल्ह्यातील सोयाबीनच्या पेऱ्यात घट होऊन २ लाख ६६ हजार ६८० हेक्टरवर पेरणीची शक्यता आहे. गतवर्षी कपाशीची १ लाख ९७ हजार ९८६ हेक्टरवर लागवड होती. यंदा ९ हजार हेक्टरने वाढून क्षेत्र २ लाख ७ हजारवर पोहोचण्याची शक्यता आहे. तूर, मूग, उडदाच्या पेऱ्यात वाढीचा अंदाज आहे.

परभणी जिल्हा खरीप २०२५ प्रस्तावित पेरणी क्षेत्र, उत्पादकता

पीक २०२४ पेरणी क्षेत्र प्रस्तावित क्षेत्र (हेक्टर) हेक्टरी उत्पादकता (क्विंटल)

सोयाबीन २८०९०५ २६६८६० १३.००

कपाशी १९७९८६ २०७८८५ ४.४०

तूर ३९०६५ ४०२३७ १२.५०

मूग ६०८३ ६२२० ९.३०

उडीद १७२३ १९०० ८.६०

ज्वारी १०७८ १००० ६.७०

बाजरी १८९ १६० ४.४५

४ लाख ९६ हजार टन उत्पादन अपेक्षित

गतवर्षी जिल्ह्यात खरीप पिकांचे ५ लाख ९ हजार ४८१ टन उत्पादन मिळाले होते. यंदाच्या खरिपातील प्रस्तावित उत्पादकतेनुसार ४ लाख ९६ हजार ८४४ टन उत्पादनअपेक्षित आहे. यंदा प्रस्तावित करण्यात आलेल्या हेक्टरी उत्पादकेनुसार सोयाबीन, ज्वारी, बाजरी च्या उत्पादकतेत घट तर कपाशी, तूर, मूग, उडीद पिकांच्या उत्पादकतेत वाढ होण्याचा अंदाज आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT