Kharip Sowing : खरीप पेरणी साडेसहा लाख हेक्टरवर प्रस्तावित

Kharip Sowing Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १ लाख ५४ हजार ७७० शेतकऱ्यांना १,५९६ कोटी ६४ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
Kharip Sowing
Kharip SowingAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : येत्या खरीप हंगामासाठी एकूण ६ लाख ८६ हजार ५६२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या हंगामात ६ लाख ७५ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९८ टक्के होती.

१,५९६ कोटी ६४ लाख पीककर्ज वाटपाचे नियोजन

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १ लाख ५४ हजार ७७० शेतकऱ्यांना १,५९६ कोटी ६४ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. तर रब्बी हंगामात ७५ हजार ११३ शेतकऱ्यांना ८०३ कोटी ३६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे नियोजन आहे. वर्षभरात खरीप व रब्बी हंगाम मिळून २४०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे नियोजन आहे.

खतांची मागणी

जिल्ह्यात रासायनिक खतांचा सरासरी वापर २ लाख ७६ हजार ४७४ टन असून खरीप हंगामासाठी ३ लाख ९१ हजार १८७ टन मागणी आहे. प्रत्यक्षात मंजूर पुरवठा ३ लाख १४६७ टन आहे. जिल्ह्यात एप्रिल २०२५ अखेर शिल्लक खतसाठा १ लाख १४ हजार ३५९ टन आहे. मंजूर पुरवठा व शिल्लक खतसाठा विचारात घेतल्यास जिल्ह्यात एकूण ४ लाख १५ हजार ८२६ टन इतके रासायनिक खतांच्या साठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण २०३२ परवानाधारक खत विक्रेते असून महाराष्ट्र खतनियंत्रण योजनेत १,१४७ विक्रेते नोंदणीकृत आहेत. त्या सर्व विक्रेत्यांकडे पॉस मशिन आहेत. ई-पॉस मशिनचे प्रशिक्षण घेतले आहे.

Kharip Sowing
Chhatrapati Sambhajinagar TOD Meter : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात बसवले ५६ हजार टीओडी मीटर

उत्पादक, विक्रेत्यांची तपासणी

जिल्ह्यात एकूण ४,२४३ बियाणे विक्रेते, २,०३२ खत विक्रेते, १,४०० कीटकनाशके विक्रेते असे एकूण ७,६७५ निविष्ठा विक्रेते आहेत. या सर्व केंद्रांची निरीक्षकांमार्फत तपासणी करण्यात येते. तसेच निविष्ठा उत्पादक, साठवणूक केंद्र यांचीही तपासणी केली जाते. जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर एक या प्रमाणे जिल्ह्यात १० भरारी पथकेही स्थापित करण्यात आली. कपाशीचे बियाणे १५ मे नंतरच विक्री करावे, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

तक्रार निवारण कक्ष आणि टोल फ्री क्रमांक

जिल्हास्तरावर एक, प्रत्येक तालुकास्तरावर एक याप्रमाणे १० निविष्ठा तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली. १५ मे ते १५ ऑगस्ट आणि रब्बी हंगामात १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हे कक्ष कार्यरत राहतील. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण होण्यासाठी कृषी विभागामार्फत १८०० २३३ ४००० हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांना ९८२२४४६६५५ हा व्हॉट्सॲप क्रमांकही शंकानिरसन, तक्रारींसाठी उपल्ब्ध करून देण्यात आला आहे.

दृष्टिक्षेपात जिल्हा

भौगोलिक क्षेत्र ः १० लाख ७ हजार हेक्टर

तालुके ९, महसूल मंडले ८४, कृषी मंडले २८

ग्रामपंचायती ८७०, एकूण गावे १३५५

सरासरी खरीप क्षेत्र ६ लाख ८४ हजार हेक्टर

एकूण खातेदार संख्या ६ लाख ३९ हजार ८२३

लघू प्रकल्प ९८, मध्यम प्रकल्प १६ आणि मोठा प्रकल्प १

पीक प्रकारानुसार प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तृणधान्य पिकांचे क्षेत्र २ लाख १८ हजार ३१४

कडधान्य पिके ५५ हजार ९७१

गळीतधान्य ४२ हजार ७२५

कापूस ३ लाख ६५ हजार ८००

पीकनिहाय प्रस्तावित पेरणीक्षेत्र (हेक्टर)

ज्वारी ६५०

बाजरी २५ हजार १५२

मका १ लाख ९२ हजार ५१२

तूर ३७ हजार ५००

मूग १३ हजार २५६

उडीद ५,२१५

भुईमूग ७,६००

तीळ ३२१

सोयाबीन ३५,१२५

कापूस ३ लाख ६५ हजार ८००

इतर ३,४३१

बियाणे मागणी (क्विंटलमध्ये)

मका ३३,३८४

तूर २,१८२

मूग ३८६

उडीद १७६

कापूस ८,९७० (१८ लाख ८८ हजार पाकिटे)

सोयाबीन बियाणे २५ हजार ७९९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com