Kolhapur News : भुदरगड तालुक्यात भात कापणी हंगाम जोमात सुरु झाला आहे. सध्या शेतकरी वर्ग आपल्या शेतातील भात पीक काढणीच्या कामात पूर्णपणे गुंतले आहेत. शेत शिवारात कामाची झुंबड उडाली आहे..अवकाळी पावसाची सततची भीती आणि बदलत्या हवामानामुळे शेतकरी आपले पीक पदरात पाडून घेण्यासाठी अक्षरश: दिवसरात्र काम करत आहेत. तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकरी वर्गाची तारांबळ उडत आहे. पण पीक पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. अवकाळीची भीती.. तरी कापणीला गती.. अशी स्थिती निर्माण झाली आहे..Paddy Harvesting : भातकापणीच्या कामात बळीराजा व्यग्र.भुदरगड तालुक्यात १६ हजार १०८ हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतले आहे. तालुक्यात ऊस पिका पाठोपाठ भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. विशेषत: कोकण पट्ट्यात भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या भात कापणीची कामे सुरू झाली आहेत. तालुक्याच्या काही भागांमध्ये सोयाबीन, भुईमूग, हरभरा यांसारख्या प्रमुख रब्बी पिकांच्या काढणीची कामे सुरू आहेत..काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी मिळेल त्या वेळेत मळणी व साठवणूक करण्यावर भर देत आहेत. हवामानातील अनिश्चित बदलांमुळे अवकाळी पावसाचं सावट नेहमीच डोक्यावर आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता लवकरात लवकर पीक काढण्याचा प्रयत्न करत आहेत. .Paddy Harvesting : सिंधुदुर्गात २५ हजार हेक्टरवर भात पिकाची कापणी पूर्ण.सध्या भात, ज्वारी, गहू हरभरा, भुईमूग, सोयाबीन यांसारख्या पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी मजुरांची टंचाई जाणवत असल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. शेतकरी फुट्टा पद्धतीने शेतीची व भात कापणीची कामे उरकण्याचा प्रयत्न करत आहेत..परतीच्या पावसाचा भात कापणीवर परिणाम होतो. परतीच्या पावसामुळे, कापणीसाठी तयार झालेल्या भाताच्या शेतात अतिरिक्त ओलावा येतो, धान्य हातात पिकल्यानंतर त्यात आर्द्रता वाढते आणि त्यामुळे कापणी आणि साठवणीच्या वेळी गूंठ, बुरशीसारख्या समस्या आणि धान्याच्या गुणवत्तेत घट येऊ शकते. या उपाययोजनांनी परतीच्या पावसाचा संभाव्य दुष्परिणाम कमी करता येतो आणि भाताच्या गुणवत्तेत नुकसान टाळता येते.- महादेव खुडे, तालुका कृषी अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.