Jalgaon News : शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका अजूनही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. याचीच प्रचीती सध्या मुक्ताईनगर तालुक्यात दिसून येत आहे. वाघ व इतर प्राण्यांच्या दहशतीमुळे शेतकरी शेतात जाणे टाळत असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे..याबाबत वन विभागातील वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करणे गरजेचे झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून मुक्ताईनगर तालुक्यातील काही भागांत शेतकऱ्यांसह शेतमजुरांना प्रत्यक्ष वाघ व त्याचे ठसेही दिसून आलेले आहेत..Tiger Attack : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार.या भागांत अस्तित्वाबाबत शास्त्रीय पद्धतीने शोध घेत असतानाच पांगरीनजीक शेतकऱ्यांच्या वडवे मानेगाव या शिवारात जंगलातील वाघ समोर आला. तेव्हापासून या भागातील शेतकऱ्यांसह शेतमजुरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..अनेक पाळीव प्राण्यांवर हल्लेकाही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर तालुक्यात अनेक पाळीव प्राण्यांवर जीवघेणे हल्ले झालेत. त्यामुळे शेतकरी बांधव भयभीत झालेले आहेत. जगाचा पोशिंदा अशी ओळख असलेला बळीराजा सध्या वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे भीतीयुक्त जीवन जगताना दिसून येत आहेत. .Tiger Habitat : रत्नागिरी जिल्ह्याच्या वनक्षेत्रात चार नर वाघांचे वास्तव्य.मुक्ताईनगर तालुक्यात वाघ वारंवार दिसून येत असल्याने शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्याचे धाडस करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कामे रखडली आहेत..वाघ अथवा इतर प्राणी कुठून तरी येतील व आपल्यावर हल्ला करतील, आपला जीव घेतील? या भीतीने शेतकरी व शेतमजूर शेताकडे जाताना विचार करू लागले आहेत. त्याचा विपरित परिणाम म्हणून शेतातील उत्तम पद्धतीने आलेल्या पिकांवर होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मानेगाव, वडवे, हरताळे या भागांत वाघ दिसून आला. त्यानंतर वनविभागाकडून या परिसरात कॅमेरेसुद्धा लावण्यात आलेत. या कॅमेऱ्यात वाघाचे ठसे दिसून आले आहेत. तरीदेखील वनविभागाने सुरुवातीला जनजागृती केली. सोबतच रात्रीच्या वेळेस त्या भागामध्ये वनविभागाचे ६६ कर्मचारी पेट्रोलिंग करीत आहेत.- कृपाली शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.