Sangli News : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांसाठी पीक कर्ज वितरणास गती आली आहे. जून अखेर १ लाख १० हजार शेतकऱ्यांना ११७९ कोटी ७९ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. जिल्हा बॅंकेने सर्वाधिक कर्ज वितरण केले आहे. सप्टेंबर अखेर कर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.
यंदा खरीप हंगामासाठी सांगली जिल्हा बॅंकेसाठी ९३ हजार ३६७ शेतकऱ्यांना ११३३ कोटी ५६ लाख इतके लक्षांक आहे. राष्ट्रीयकृत, व्यापारी बॅकांना ४७ हजार ५५१ शेतकऱ्यांना ५७८ कोटी ३१ लाख, खासगी बॅंकेसाठी २४ हजार २९४ शेतकऱ्यांना २९५ कोटी ८२ लाख आणि ग्रामीण बॅंकांना ४५३ शेतकऱ्यांना ५ कोटी ६१ लाख असे एकूण १ लाख ६५ हजार ६६५ शेतकऱ्यांना २०१३ कोटी ३० लाख कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.
जिल्हा बॅंक, राष्ट्रीयीकृत, व्यापारी बॅंका, खासगी, ग्रामीण बॅंकांनी कर्ज वितरणास एप्रिल महिन्यापासून सुरुवातही केली आहे. यंदा मे च्या मध्यापासून पावसाने हजेरी लावली आहे. पेरणीसाठी कर्ज घेण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता करून बॅंकाकडे जमाही केली.
जिल्ह्यात एप्रिल अखेर ४३ हजार ७४३ शेतकऱ्यांना ३८७ कोटी १४ लाखांचे कर्ज वितरण केले होते. मे आणि जून या दोन महिन्यात ६६ हजार २६१ शेतकऱ्यांना ७९२ कोटी ६५ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हा बॅंकने ९८ हजार ९८२ शेतकऱ्यांना ९०० कोटी ७२ लाखांचे कर्जाचे वाटप केले आहे.
जूनअखेर खरीप हंगामातील पीक कर्ज वितरण
बॅंक सभासद संख्या रक्कम
जिल्हा बॅंक ९८९८२ ९०० कोटी ७२ लाख
राष्ट्रीयीकृत, व्यापारी बॅंका ९२७० २१५ कोटी ८५ लाख
खासगी बॅंका १५३७ ५९ कोटी ६० लाख
ग्रामीण बॅंका २१५ ३ कोटी ६२ लाख
एकूण ११०००४ ११७९ कोटी ७९ लाख
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.