Karnja APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Karnja APMC : कारंजा बाजार समितीने वार्षिक क्रमवारीत दबदबा कायम

APMC Ranking : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने बाजार समित्यांची सन २०२३-२४ या वर्षाची वार्षिक क्रमवारी जाहीर केली आहे.

Team Agrowon

Washim News : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने बाजार समित्यांची सन २०२३-२४ या वर्षाची वार्षिक क्रमवारी जाहीर केली आहे. यात कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीने १७१.५ गुण प्राप्त करून राज्यस्तरावर दुसरा क्रमांक पटकावला आहे.

१८८६ साली हैदराबाद रेसिडेंसी ऑर्डर यांच्या आदेशाने भारतात प्रथम कारंजा बाजार समितीची स्थापना झाली. विदर्भामध्ये कारंजा येथे कापूस या शेतमालाचा बाजार भारतात सर्वप्रथम नियंत्रित केला गेला. त्यानुसार कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती ही भारतात १८८६ साली सर्वप्रथम अस्तित्वात आली. अकोला, अमरावती, वाशीम व यवतमाळ जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण व महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते.

गेल्या काही वर्षात या बाजार समितीची मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. माजी आमदार तथा माजी सभापती (कै.) प्रकाश डहाके यांच्या कार्यकाळात ही बाजार समिती भरभराटीला आली. त्यांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेऊन बाजार समितीला राज्यात नावलौकिकास नेले. त्यामुळे शेतकरी आपला माल मोठ्या प्रमाणावर या बाजार समितीत आणू लागले.

जास्त माल आल्याने कधीकधी दोन-दोन दिवस मालाची मोजणी होत नाही. बाजार समितीत शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अल्पदरात जेवण, शेतमाल ठेवण्यासाठी वेअर हाऊस, शेतमाल हर्राशीसाठी गाळे आदी योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. यामुळे या बाजार समितीने सातत्याने क्रमवारीत विदर्भातून अव्वल राहण्याचा बहुमान प्राप्त होत आहे. सध्या सभापती म्हणून श्रीमती सईताई प्रकाश डहाके प्रयत्नरत आहेत.

पणन संचालनालयाने नुकतीच २०२३-२४ ची राज्यातील बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर केली. त्यामध्ये कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचा दुसरा क्रमांक आला. साडे सहा गुण कमी पडल्याने पहिला क्रमांक गेल्याची खंत आहे. पण नाराजी नाही. कारंजा बाजार समितीचे स्थान २०२२-२३ मध्ये होते ते कायम आहे. कारंजा बाजार समिती राज्यात अव्वल व्हावी हे माजी सभापती (कै.) प्रकाश डहाके यांचे स्वप्न होते. ते पुर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यासाठी चांगल्या बाजार समित्यांना भेट देऊन राहिलेली उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न, पण स्वतः, बाजार समितीचे सचिव व संचालक मंडळ करणार आहे.
-आ. सईताई डहाके, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, कारंजा, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Conservation : पाणी हेच शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण

Rain Crop Loss : मराठवाड्यातील ३३ मंडलांत अतिवृष्टी

Rain Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यातील बावीस मंडलांत अतिवृष्टी

Krushi Samrudhhi Yojana : कृषी समृद्धीमधील कामांचे त्रयस्थ मूल्यमापन होणार

Sunflower Cultivation : बारामतीत सुर्यफूलाकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल

SCROLL FOR NEXT