Solapur News: येथील बाजारात मक्याचे दर हमीभावापेक्षा प्रतिक्विंटल ५०० ते ९०० रुपयांनी कमी झाल्याने शेतकरी सरकारी खरेदी केंद्रांकडे वळले आहेत. मात्र जिल्ह्यासाठी केवळ २५ हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी थांबली असून उद्दिष्ट वाढविण्याची मागणी जोर धरत आहे. पणन प्रशासनाने ८० हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मागितले आहे. परंतु अद्याप त्यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे आता शेतकरी परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत..गेल्या काही हंगामात मक्याला चांगला भाव मिळाल्याने यंदा खरिपात व रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनी मक्याची लागवड वाढवली. विशेषतः जिल्ह्यात खरिपात सरासरीच्या दीड पटीहून अधिक तर रब्बीत दुपटीहून अधिक हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी केली..Maize Procurement: सांगोल्यात २१ हजार क्विंटल मका खरेदीविना पडून.राज्यासह मका उत्पादन घेणाऱ्या सर्वच राज्यांमध्ये वाढत्या मका पेरणीमुले देशात मक्याचे उत्पादन वाढले. पण इथेनॉलसाठी तांदळाचा वाढता वापर व उसाच्या उपलब्धतेमुळे मक्याचा उठाव कमी झाला. त्यामुळे मका दर दबावात आला आहे. अमेरिकेशी व्यापार करारात डीडीजीएस आयातीला परवानगी दिल्याने मक्याचे दर आणखी कमी झाले आहेत..क्षेत्र वाढले, मात्र कमी खरेदीजिल्ह्यातील खरीप मक्याचे सरासरी क्षेत्र ४७ हजार ८६१ हेक्टर आहे. प्रत्यक्षात ८८ हजार १२२ हेक्टर (१८४ टक्के) क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली. रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र ४७ हजार १२ हेक्टर आहे. या हंगामात दुपटीहून अधिक म्हणजे ९५ हजार २६४ हेक्टरवर मक्याची लागवड झाली. त्याची टक्केवारी २०३ टक्के इतकी आहे. मात्र, जिल्ह्यातील सात हमीभाव केंद्रांवर केवळ २५ हजार क्विंटल खरेदी झाली आहे. पणन विभागाने ८० हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी केली आहे..Maize Procurement: बारदानाअभावी मका खरेदी ठप्प.राज्यासाठी केवळ ४८ हजार ५०० टन उद्दिष्टराज्यात खरीप हंगामातील मक्याचे सरासरी क्षेत्र नऊ लाख ३३ हजार ८१९ हेक्टर आहे. प्रत्यक्षात १४ लाख ५२ हजार ४८२ हेक्टरवर (१५६ टक्के) पेरणी झाली. तर रब्बी हंगामातील क्षेत्र तीन लाख ७५ हजार १७० हेक्टर आहे. प्रत्यक्षात सहा लाख ५९ हजार ५२० हेक्टरवर मक्याची पेरणी झाली. त्याची टक्केवारी १७६ इतकी आहे..राज्यात मक्याचे क्षेत्र वाढले असताना सरसकारने हमीभावने मका खरेदीसाठी केवळ ४८ हजार ५०० टन उद्दिष्ट दिले आहे. मका विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागल्याने मार्केटिंग फेडरेशनने एक लाख ७० हजार टन मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. त्याला लवकर परवानगी देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.