
Amravati News : अमरावती ः राज्यात लागू होत असलेल्या मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होणार आहे. भातकुली तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्यात येणार आहे. याचा थेट परिणाम अमरावती बाजार समितीच्या आर्थिक उलाढालीवर होणार असल्याने शासनाच्या या निर्णयास न्यायालयात आव्हान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यात नव्याने ६५ बाजार समिती स्थापन करण्यात येणार असून, अमरावती जिल्ह्यातील त्यामध्ये दोन बाजार समित्यांचा समावेश आहे. एक तालुका एक बाजार समिती अशी घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात पणन विभागाने राज्यातील ६८ तालुक्यांत बाजार समितीच अस्तित्वात नसल्याचा अहवाल दिला आहे. त्याअनुषंगाने मुंबईतील तीन तालुके वगळून ६५ तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यासंबंधीचा शासकीय अध्यादेशही निर्गमित झाला असून, त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील भातकुली व चिखलदरा येथे स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. भातकुली तालुक्यातील गावांतील शेतकऱ्यांसाठी अमरावती बाजार समिती येथे सोय होती. त्यांचा कृषिमाल या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येतो. आता ही सुविधा भातकुली येथे होणार आहे. त्यासाठी अमरावती बाजार समितीचे विभाजन करण्यात येणार आहे.
भातकुली व चिखलदरा येथे स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. भातकुली तालुक्यातील गावांतील शेतकऱ्यांसाठी अमरावती बाजार समिती येथे सोय होती. त्यांचा कृषिमाल या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येतो. आता ही सुविधा भातकुली येथे होणार आहे. त्यासाठी अमरावती बाजार समितीचे विभाजन करण्यात येणार आहे.
उलाढालीवर आर्थिक परिणाम होणार
अमरावती बाजार समिती अंतर्गत दोन्ही तालुक्यांतील २३१ गावांची उलाढाल होते, त्यामध्ये भातकुली तालुक्यातील ११० गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे भातकुली बाजार समितीकडे वर्ग करण्यात आल्यास अमरावती बाजार समितीच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम पडणार आहे. या बाजार समितीत १५०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत असून बाजार समितीला दरवर्षी १७ ते १८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.
...तर संचालक मंडळ बरखास्तीची वेळ
अमरावती बाजार समितीअंतर्गत बडनेरा व तिवसा अशा दोन मतदार संघाचा भाग येतो. संचालक मंडळात अमरावती तालुक्यासह या दोन्ही मतदारसंघातील सदस्य आहेत. भातकुली बाजार समिती झाल्यास संचालक मंडळाचेही विभाजन करावे लागणार आहे. त्यासाठी अमरावती बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करावे लागणार आहे. याशिवाय जमीन व मालमत्तेचेही विभाजन करावे लागणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.