Social Welfare Department Agrowon
ॲग्रो विशेष

Social Welfare Department : ‘समाजकल्याण’कडून कडबाकुट्टी, कृषिपंप मिळणार

ZP Solapur : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे लाभार्थींना यंदा कडबाकुट्टी, पाच एचपी कृषिपंप, आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना सायकल आणि इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी टॅली तर आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत ‘एमएस-सीआयटी’ची संधी मिळणार आहे.

Team Agrowon

Solapur News : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे लाभार्थींना यंदा कडबाकुट्टी, पाच एचपी कृषिपंप, शेळी गट (चार शेळ्या व एक बोकड), आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना सायकल आणि इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी टॅली तर आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत ‘एमएस-सीआयटी’ची संधी मिळणार आहे.

जिल्ह्यातील २० टक्के मागासवर्गीय तर पाच टक्के दिव्यांग लाभार्थींना यंदा समाजकल्याण विभागाकडून विविध साहित्य व योजनांचा लाभ दिला जाणार आहे. एससी, एसटी व व्हीजेएनटी प्रवर्गातील लाभार्थींनाच समाजकल्याण विभागाकडून योजनांचा लाभ मिळतो. त्यामध्ये एक लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले लाभार्थीच या योजनांसाठी अर्ज करू शकतात.

या प्रवर्गातील आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील ७० कॉम्प्युटर सेंटरवर मोफत ‘एमएस-सीआयटी’ तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘टॅली’ कोर्स करण्याची संधी दिली जाते. त्यासाठी प्रतिविद्यार्थी सव्वाचार ते साडेचार हजार रुपये केंद्र चालकांना दिले जातात. शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्यासाठीचे अर्ज करणे अपेक्षित आहेत.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना

मागील तीन वर्षांत एकदाही समाजकल्याण विभागाच्या योजनेचा लाभ न घेतलेल्या एससी, एसटी, व्हीजेएनटी या प्रवर्गातील लाभार्थींना (वार्षिक उत्पन्न एक लाखांपर्यंत) शेळीगट मिळतो. त्यात चार शेळ्या व एका बोकडाचा समावेश असतो आणि त्यासाठी समाजकल्याणकडून ४२ हजार रुपये दिले जातात.

पण, संबंधित लाभार्थींनी त्याची खरेदी करून पावती दिल्यास ग्रामसेवक किंवा विस्ताराधिकाऱ्यांकडून पाहणी होते आणि मग लाभार्थीच्या खात्यात रक्कम वितरित केली जाते. याशिवाय सात-बारा उतारा, वीजबिल जोडून अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एचपीचा वीजपंप (२५ हजार रुपये किंमत) देखील दिला जातो. ज्यांच्याकडे जनावरे आहेत, त्यांना कडबाकुट्टी यंत्र दिले जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : दिवाळीच्या सणावर संकटाचे ढग

Farmer Relief : पूर्व विदर्भामध्ये ५६ हजारावर शेतकऱ्यांना मदतनिधीची प्रतीक्षाच

Sugar MSP : केंद्राने साखरेची किमान विक्री किंमत ४३०० रुपये करावी

Paddy Harvesting : भुदरगडमध्ये भात कापणीला वेग

Tiger Terror : वाघाच्या दहशतीने शेतीकामेच रखडली

SCROLL FOR NEXT