Paddy Farming
Paddy FarmingAgrowon

Paddy Cultivation : भातलागवडीसाठी आधुनिक प्रणाली

Paddy Farming Technique : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून जनजागृती केली जात आहे. आधुनिक पद्धतीने लागवड करण्याबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिके दाखवण्यात येत आहे.
Published on

Alibaug News : कृषी विभागाकडून यंदा जिल्ह्यात ९८ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भात लागवड करण्याचे नियोजन केले आहे. पावसाचा जोर वाढल्‍याने आठवडाभरापासून भात लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३० टक्क्‍यांहून अधिक कामे पूर्ण झाली असून १५ दिवसांत शंभर टक्के कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Paddy Farming
Paddy Farming : बळीराजाला आता आवणीचे वेध

काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने तर काही ठिकाणी आधुनिक पद्धतीने लागवड करण्यात येत आहे. भाताची उत्‍पादकता वाढावी, यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून जनजागृती केली जात आहे. आधुनिक पद्धतीने लागवड करण्याबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिके दाखवण्यात येत आहे.

Paddy Farming
Paddy Farming : रिमझीम पावसात भात लागवडीची लगबग

जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडूनही याला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यात चारसूत्री पद्धतीने भातलागवड करण्याकडे कल दिसून येत आहे.

रोजगाराचे साधन खुले

भातलावणीची कामे सुरू झाल्‍याने अनेक गावे, वाड्यांमधील कामगारांना कामे मिळू लागली आहेत. या कामांतून रोजगार उपलब्‍ध होत आहे. यात दररोज ३०० ते ४०० रुपये मजुरी, दोन वेळचा चहा-नाष्‍टा, दुपारच्या जेवणाचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com