Beed News: कापूस, सोयाबीन व तूर या पिकांना योग्य भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी शेतकरी हक्क मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हातात कापसाची व तुरीची झाडे घेतलेल्या शेतकऱ्यांनी शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली..शेतीमालाच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली असताना, शेतीमालाला मात्र योग्य व न्याय्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात असंतोष आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन व तूर या पिकांच्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे प्रशासनाला निवेदन देण्यात आले..Farmers Protest: बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शेतकरी धडकणार .सुमारे १४ वर्षांपूर्वीचेच शेतीमालाचे दर आजही मिळत आहेत, मात्र खते, बियाणे, मशागत, कीटकनाशके, डिझेल, वीज व मजुरीचे दर दुपटीने वाढले आहेत. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला असून शिक्षण, लग्न व घरखर्चाचा बोजा असह्य झाला आहे. या आर्थिक तणावातूनच शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे..Sugar Farmer Protest: शरद कारखान्यासमोर भेंडवडे ग्रामस्थांचे आंदोलन.शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तत्काळ लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. या मोर्चात राजेंद्र आमटे, अशोक येडे, डॉ. गणेश ढवळे, कुलदीप करपे, सुहास जायभाय, राजू गायके, बाळासाहेब मोरे पाटील, गणेश नाईकवाडे, अर्जुन सोनवणे, कॉ. अजय बुरांडे, अजय राऊत, दिनेश गुळवे, धनंजय मुळे, शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख, धनंजय मुळे, नयना भाकरे, हिराबाई कांबळे,.अंकुश सातपुते, प्रा. ज्ञानेश्वर राऊत, मोहन गुंड, नारायण गोले, गणेश मस्के, संगमेश्वर आंधळकर, भास्कर खंडे, रामधन जमाले, प्रा. शिवराज बांगर, गणेश बजगुडे, अनिल घुमरे, सुहास पाटील, ॲड. मनीषा कुपकर, दिनकर रिंगणे, विश्वाबर गिरी, दत्ता प्रभाळे, राहुल साळुंके, संतोष शिंदे, श्रीराम कोरडे, श्रीकांत गदळे, सुरेश गरड, अप्पा डाके, अप्पासाहेब महानोर, हनुमान घोडके यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्याकापसाला किमान १२ हजार रुपये प्रति क्विंटल दर द्यावासोयाबीनसाठी ७ हजार रुपये व तुरीसाठी १२ हजार रुपये प्रति क्विंटल दर निश्चित करावासीसीआयकडून होणारी अडवणूक थांबवून सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावाहमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या बाजार समित्या व व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.बाजारात कमी दराने खरेदी झालेल्या शेतमालाच्या दरातील फरक सरकारने अनुदान स्वरूपात भरून द्यावाविविध योजना, सबसिडी, अनुदान व पीक विम्याची थकित रक्कम तत्काळ जमा करावीमे महिन्यापूर्वी सर्व खरीप व रब्बी पिकांचा हमीभाव जाहीर करावामहाडीबीटी पोर्टलवरील प्रलंबित अनुदान त्वरित वितरित कर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.