Nashik News: कुंदेवाडी (ता. निफाड) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्राने अधिक उत्पादकता व तांबेरा प्रतिबंधक वाण विकसित केले. त्यामधील ‘फुले समाधान’ वाणाचा राज्यभर विस्तार झाला. या वाणाचे क्षेत्र वाढत आहे. चालू हंगामात कृषी संशोधन केंद्रातील बियाणे विक्री केंद्रातून सुमारे २५ टन विक्रमी बियाणे विक्री झाली आहे, अशी माहिती केंद्राचे कृषी विद्या विभागाचे वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. भरत मालुंजकर यांनी दिली..कुंदेवाडी येथील संशोधन केंद्राने विकसित केलेला ‘फुले समाधान’ हा गहू वाण सरबती प्रकाराचा असून, अधिक उत्पादन देणारा वाण महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आला आहे. योग्य पीक नियोजन करून त्यास व्यवस्थापनाची जोड दिल्याने गहू पीक शेतकऱ्यांनी किफायतशीर करून दाखविले आहे..Wheat Varieties: वेळेवर पेरणीसाठी गव्हाचे सर्वोत्तम ४ वाण; वाढवा उत्पादनाची खात्री!.त्यामुळे शेतकऱ्यांची या वाणाला पसंती वाढत आहे. हा वाण अधिक उत्पादनक्षम असून, प्रति हेक्टर ४० ते ४५ क्विंटल उत्पादन देतो. वेळेवर बागायती तसेच उशिरा पेरणीसाठीही हा वाण उपयुक्त आहे..साधारण २३ डिसेंबरपर्यंत त्याची पेरणी करता येते, ही या वाणाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्याचप्रमाणे हा वाण बुटका असल्याने पीक लोळत नाही. तसेच फुटव्यांची संख्या जास्त आणि समान असते. या वाणाचा वाढीचा कालावधी कमी म्हणजेच ११० ते ११५ दिवसांचा आहे..Wheat Varieties: गव्हाचे तांबेरा आणि करपा रोगासाठी प्रतिकारक वाण .ओंबी भरणे आणि दाणे भरण्याचे प्रमाण अधिक असून, हजार दाण्यांचे वजन सुमारे ४३ ग्रॅम आहे. यामध्ये प्रथिनांचे प्रमाणही जास्त म्हणजे १२.५ टक्के असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या वाणाला विशेष पसंती मिळत असल्याची माहिती डॉ. मालुंजकर यांनी दिली आहे..वाणाची वैशिष्ट्येबागायतीत वेळेवर किंवा उशिरा पेरणीसाठी एकमेव शिफारशीत सरबती वाणफुटव्यांची संख्या जास्त आणि समानचपातीसाठी उत्तम.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.