Chana Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Cultivation : काबुली हरभरा पेरा पूर्ण

Chana Sowing : खानदेशात मोठ्या काबुली हरभरा पिकाच्या क्षेत्रात सतत वाढ होत आहे. पेरणी पूर्ण झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मोठ्या काबुली हरभरा पिकाच्या क्षेत्रात सतत वाढ होत आहे. पेरणी पूर्ण झाली आहे. यंदाची पेरणी सर्वत्र झाल्याची स्थिती असून, सुमारे २५ हजार हेक्टरवर ही पेरणी झाल्याचा अंदाज आहे.

खानदेश मोठ्या काबुली हरभऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यास गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, बडोदा, मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाल व राज्यातील अनेक बाजारांत मागणी असते. त्याचे दरही देशी किंवा तपकिरी, फिकट गुलाबी हरबऱ्याच्या तुलनेत अधिक असतात.

त्याची पेरणी जळगावातील चोपडा, रावेर, यावल, धुळ्यातील शिरपूर या भागात केली जाते. याच भागात त्याचे मोठे क्षेत्र असते. परंतु यंदा काबुलीची पेरणी खानदेशात सर्वत्र होत आहे.

या हरभऱ्याची पेरणी काढणी पूर्ण झालेल्या केळी बागा, कापसाखालील रिकाम्या झालेल्या क्षेत्रात केली जात आहे. त्यास सिंचनासाठी पाण्याची गरज इतर हरभरा पिकांच्या तुलनेत अधिक असते.

मोठ्या काबुलीचे बियाणेही महाग आहे. त्याची पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत झाली आहे. ही पेरणी आता बंद झाली आहे. अनेकांनी नोव्हेंबर व या महिन्यात पेरणी केली असून, पीक फुलोऱ्यावरही अनेक भागात आले आहे.

यंदा पेरणी नंदुरबारातील शहादा, तळोदा, नंदुरबार, धुळ्यातील धुळे, साक्री, जळगावातील मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर या भागातही झाली आहे. पाऊसमान चांगले राहिल्याने मोठ्या काबुलीची पेरणी वाढली आहे. सर्वाधिक पेरणी जळगाव जिल्ह्यात सुमारे १८ ते १९ हजार हेक्टरवर झाली आहे. यापाठोपाठ धुळे व नंदुरबारमध्ये पेरणी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department: दांगट समितीकडून गैरव्यवहारांची चौकशी नको

China Fertilizer Ban: चीनकडून खत निर्यात थांबल्याने उद्योगांवर परिणाम निश्चित

Aashadhi Wari 2025: संतांचे पालखी सोहळे पंढरीच्या वेशीवर

Gujrat Onion Farmers: गुजरातच्या कांदा उत्पादकांना क्विंटलमागे २०० रुपयांची मदत

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ रद्द करण्याची सरकारला सद्‌बुद्धी दे

SCROLL FOR NEXT