Jowar Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Sowing : चारा, धान्यासाठी ज्वारीला पसंती

Jowar Cultivation : चारा आणि धान्याची उपलब्धता त्यासोबतच बाजारात मिळणारा दर यामुळे अंजनगावसूर्जी तालुक्‍याच्या काही गावांतील शेतकऱ्यांनी पुन्हा ज्वारीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : चारा आणि धान्याची उपलब्धता त्यासोबतच बाजारात मिळणारा दर यामुळे अंजनगावसूर्जी तालुक्‍याच्या काही गावांतील शेतकऱ्यांनी पुन्हा ज्वारीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे यंदा खोडगाव आणि देवगाव या दोन गावांतच ज्वारी खालील क्षेत्र ६५ ते ७० एकरांवर पोचण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

तर तालुक्यात २१५ एकरांवर लागवडी पोहोचणार आहे. आत्मा प्रकल्पातून ज्वारी लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले. त्यानंतर यंदा शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने हे क्षेत्र वाढीवर भर दिला आहे.

देवगाव (ता. अंजनगावसूर्जी) हा परिसर पूर्वीपासूनच ज्वारी लागवडीसाठी प्रसिद्ध होता. परंतु गेल्या काही वर्षांत खरीप हंगामात अतिवृष्टी, पावसाचा खंड अशी स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपातील ज्वारी क्षेत्र कमी केले.

आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी या भागात पुन्हा ज्वारी लागवड वाढावी यासाठी अनुदानात्मक योजना राबविण्याचा निर्णय घेतला. ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना प्रती एकरी एक हजार रुपये अनुदान डिबीटीद्वारे देण्यात आले. शेतकऱ्यांना याद्वारे दोन एकरातून ४५ क्‍विंटलची उत्पादकता झाली.

अंजनगावसूर्जी बाजार समितीत ज्वारी तीन हजार रुपये क्‍विंटल तर काही शेतकऱ्यांची ३५०० रुपये क्‍विंटलने विकल्या गेली. काही शेतकऱ्यांनी ग्राहकांना थेट विक्रीवरही भर दिला. देवगाव परिसरात पशुपालकांची संख्या अधिक आहे. या जनावरांना कडबा देखील उपलब्ध झाला. तसेच यंदा क्षेत्र वाढणार असल्याची माहिती अंजनगावचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र तराळे यांनी दिली.

माझ्याकडे सहा म्हशी आहेत. ६० लिटर दूध मिळते. गेल्या हंगामात पहिल्यांदा ज्वारी लावली. दोन एकरांतून ४५ क्‍विंटल धान्य मिळाले सोबतच जनावरांसाठी कडबा सुद्धा. त्यामुळे यंदा तीन एकरांवर ज्वारी लागवड करणार आहे. जानेवारीत लागवड आणि एप्रिलमध्ये हे पीक काढणीस येते. सुरुवातीला तुषारव्दारे चार तर कणसावर असताना दोन पाळ्या याप्रमाणे पाण्याच्या सहा पाळ्या देण्यात आल्या.
- विक्‍की दिलीपराव खारोडे, शेतकरी, देवगाव, अमरावती
आत्माअंतर्गत शेतकऱ्यांना प्रती एकरी एक हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. ज्वारीची चांगली उत्पादकता आणि दरही मिळाल्याने शेतकरी आता उत्स्फूर्तपणे ज्वारी लागवडीसाठी पुढे आले आहेत. चारा आणि धान्य असा दुहेरी फायदा यातून होतो.
- अर्चना निस्ताने प्रकल्प संचालक, आत्मा, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT