Jowar Sowing : मराठवाड्यात यंदा ज्वारीची पेरणी कमीच

Rabi Season Update : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत रब्बी ज्वारीची पेरणी कमीच झाली आहे. सुरुवातीला जमिनीत ओल नसल्याने पेरणी कमी झाली.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत रब्बी ज्वारीची पेरणी कमीच झाली आहे. सुरुवातीला जमिनीत ओल नसल्याने पेरणी कमी झाली. आता काही भागात हरभरा मोडून रब्बी ज्वारीला शेतकऱ्यांनी पसंती दिल्याने क्षेत्र वाढले आहे.

यंदाचा रब्बी हंगामात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण ६ लाख ७३ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रांवर रब्बी ज्वारीची पेरणी अपेक्षित होती. या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ५ लाख १० हजार ५८३ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. वाढलेले दर पाहता रब्बी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची आशा होती.

Rabi Sowing
Jowar Fodder Rate : बार्शीचा ज्वारी कडबा खातोय राज्यात ‘भाव’

काही भागात अवेळी पाऊस पडल्यानंतर हरभरा मोडून रब्बी ज्वारीची पेरणी करण्याला पसंती देणाऱ्या शेतकऱ्यांनंतरही रब्बी ज्वारीची अपेक्षित पेरणी झालीच नसल्याची स्थिती आहे. पेरणी झालेल्या छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यात पेरणी झालेल्या ७५ टक्के क्षेत्रांसह लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यात पेरणी झालेल्या ७६ टक्के रब्बी ज्वारी क्षेत्राचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची सांगता एक आठवड्यांनी होणार आहे. २०२३-२४ मधील रब्बीत गल्ले बोरगाव शिवारात ‘परभणी सुपर मोती’ या वाणाचे क्षेत्र कमी अधिक १०० एकर आसपास राहील.

Rabi Sowing
Jowar Irrigation : ज्वारीस द्या संरक्षित पाणी

गल्लेबोरगाव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रब्बी ज्वारी पीक घेणारे महत्त्वाचे गाव आहे. खरिपात मका आणि रब्बीत ज्वारी असे पिके येथील शेतकरी घेतात. या गावाची जमीन अतिशय उत्तम आहे. गेल्या रब्बीत अनेक शेतकऱ्यांना एकरी १२ क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळाले होते.

पाच जिल्ह्यातील रब्बी ज्वारीचे सरासरी व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्केवारी

छ. संभाजीनगर ४६३७७ २५९२६ ५५.९०

जालना ८६९३८ ५७६८६ ६६.६५

बीड १६८८२२ १४५३५५ ८६.१०

धाराशिव १८१४२७ १२७२३१ ७०.१२

लातूर ३२९४४ ३२५५७ ९८.८३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com