Jamun Market Agrowon
ॲग्रो विशेष

Jamun Season 2025: सिंधुदुर्गात जांभूळ हंगामाला धीम्या गतीने सुरुवात

Jamun Rate: सिंधुदुर्गात अखेर वीस ते पंचवीस दिवस विलंबाने जांभूळ हंगामाला धीम्या गतीने प्रारंभ झाला आहे. सध्या उत्पादन खुप कमी प्रमाणात असल्याने प्रति किलो २५० ते ३०० रुपये दर मिळत आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: सिंधुदुर्गात अखेर वीस ते पंचवीस दिवस विलंबाने जांभूळ हंगामाला धीम्या गतीने प्रारंभ झाला आहे. सध्या उत्पादन खुप कमी प्रमाणात असल्याने प्रति किलो २५० ते ३०० रुपये दर मिळत आहे. दरम्यान या वर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता अधिक आहे.

दरवर्षी साधारणपणे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात जांभूळ हंगामाला प्रारंभ होतो. परंतु या वर्षी लांबलेल्या पावसामुळे जांभळाच्या झाडांना मोहर विलंबाने आला. थंडीतील चढ-उतारामुळे एकाच झाडाला दोन-तीन टप्प्यांत मोहर आला. त्यामुळे सध्या एकाच झाडावर विविध स्थिती दिसून येत आहे.

या स्थितीमुळे जांभूळ उत्पादक हैराण झाले आहेत. एकाच झाडावर हिरवी, परिपक्व झालेली अशी जांभळे दिसून येत आहेत. त्यामुळे काढणी करताना अडचण होत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जांभूळ हंगाम सुरू आहे. अतिशय धीम्या गतीने हंगामाची सुरुवात आहे. अपेक्षित उत्पादन नसल्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे.

त्यामुळे जांभळाच्या दरात चांगली सुधारणा झालेली आहे. जांभळाला सध्या प्रति किला २५० ते ३०० रुपये दर मिळत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर शहरांतून जांभळांना मोठी मागणी आहे. परंतु तितके उत्पादन येत नसल्याने शेतकरी हतबल आहेत.

जिल्ह्यातील निरूखे, कुंदे, आकेरी, सावंतवाडी, आंब्रड, माणगाव, कालेली, कोलगाव यांसह जिल्ह्याच्या विविध भागांत जांभळाची पांरपरिक लागवड आहे.

दरवर्षीच्या तुलनेत विलंबाने हंगाम सुरू झाला आहे. परंतु झाडांची स्थिती धक्कादायक आहे. एकाच झाडावर वेगवेगळी स्थिती दिसून येत आहे. बदलत्या वातावरणाचा हा परिणाम असून त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. जांभूळ व्यवसायात विस्कळीतपणा येणार आहे.
अनिरुद्ध करंदीकर, जांभूळ उत्पादक, निरूखे, ता. कुडाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beej Bhandval Karj Yojana: गरीब आणि गरजू कुटूंबाना सरकारकडून मिळतयं ७ लाख रुपये कर्ज; पाहूयात काय आहे अर्ज प्रक्रिया

Khandesh Heatwave: खानदेशात उष्णतेचा तडाखा कायम

Maharashtra Cabinet Decisions: शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Agrowon Podcast: तुरीच्या भावावरील दबाव कायम; सोयाबीन टिकून, कापूस स्थिर, जांभळाला मागणी तर ज्वारी आवक सुधारली

Summer Soybean Production: खानदेशात उन्हाळी सोयाबीनच्या उत्पादनात घट

SCROLL FOR NEXT