Jamun Season Delay: जांभूळ हंगाम महिनाभर लांबणार! शेतकऱ्यांची चिंता वाढली

Climate impact on Jamun: सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदाचा जांभूळ हंगाम तब्बल महिनाभर उशिरा सुरू होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अनपेक्षित पावसामुळे झाडांना विलंबाने मोहोर आला, त्यामुळे उत्पादनही घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Jamun
JamunAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात जांभूळ हंगाम महिनाभर लांबणार हे निश्‍चित झाले आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हंगाम सुरू होणार असला तरी जांभूळ उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये लांबलेल्या पावसामुळे हंगाम लांबल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

Jamun
Jamun Plant : खळद ग्रामपंचायतीकडून जांभळाच्या रोपांचे वाटप

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जांभूळ लागवड आहे. पांरपरिक पद्धतीच्या लागवडीसोबत आता काही शेतकऱ्यांनी जांभूळ झाडांची नव्याने लागवड देखील केली आहे. निरुखे, झाराप, आकेरी, कुंदे, आंब्रड, माणगाव, कोलगाव, कालेली, सावंतवाडी यांसह अन्य गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जांभूळ उत्पादन घेतले जाते.

या भागातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण जांभूळ पिकांवर आहे. मात्र या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पाऊस झाला. त्यामुळे जांभळाच्या झाडांना विलंबाने मोहोर येण्याची प्रकिया सुरू झाली. दर वर्षी साधारणपणे १५ ते २० मार्च या कालावधीत जांभूळ परिपक्व होऊन हंगामाला सुरुवात होते.

Jamun
Fruit Crop Cultivation : नवीन फळबागेसाठी जमिनीची निवड

परंतु या वर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उत्पादन सुरू होईल असा अंदाज आहे. त्यामुळे जांभूळ हंगाम तब्बल महिनाभर लांबणार हे निश्‍चित झाले आहे. बदललेल्या वातावरणाचा परिणाम जांभूळ उत्पादनावर देखील होण्याची शक्यता आहे. हंगामाकरिता कमी कालावधी मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सिंधुदुर्गातील जांभळांना मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर यांसह स्थानिक पातळीवर देखील चांगली मागणी असते.

जांभूळ हंगाम वेळेत सुरू झाला तरच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. जांभूळ फळांची स्थिती पाहता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हंगाम सुरू होईल असा अंदाज आहे. त्यानंतर केवळ महिनाभरच हंगाम कालावधी मिळतो.
अनिरुद्ध करंदीकर, जांभूळ उत्पादक आणि खरेदीदार, निरुखे, ता. कुडाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com