Orange Food Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Processing : मोसंबीपासून जॅम, जेली, मार्मालेड, स्क्वॅश

Orange Food : मोसंबीपासून जॅम, जेली, स्क्वॅश, मार्मालेड, अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून मूल्यवर्धन करता येते. अशा प्रक्रियायुक्त उत्पादनांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

Team Agrowon

कृष्णा काळे, डॉ. शहाजी कदम

मोसंबीपासून जॅम, जेली, स्क्वॅश, मार्मालेड, अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून मूल्यवर्धन करता येते. अशा प्रक्रियायुक्त उत्पादनांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

जेली

जेली तयार करण्यासाठी रसरशीत ताजी व पक्व फळे निवडावीत. फळे पाण्याने स्वच्छ धुऊन, सोलून, पांढरा पापुद्रा काढून स्वच्छ करून घ्यावीत. नंतर स्वच्छ केलेल्या मोसंबीच्या फोडींचे छोटे छोटे काप करून घ्यावेत.

स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात काप घेऊन ते बुडतील एवढ्या पाण्यात मंद शेगडीवर उकळत ठेवावेत.

थोड्या वेळाने शिजविलेले फोडींचे तुकडे मलमलच्या कापडात बांधून टांगून ठेवावेत. कापडातून झिरपणारा फोडींचा रस दुसऱ्या स्टीलच्या पातेल्यात जमा करावा.

या रसात १:१ या प्रमाणात साखर मिसळून उकळावे. हे द्रावण एकूण विद्राव्य घटक ६५ ते ६७ अंश ब्रिक्‍स वर येईपर्यंतच उकळावे.

तयार झालेली जेली रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या बरणीत भरून हवाबंद करून ठेवावी. तयार झालेली जेली थंड व कोरड्या जागी साठवावी.

मार्मालेड

मार्मालेड तयार करताना जेलीमध्ये शिजलेल्या सालीचे तुकडे टाकतात. यासाठी सुरुवातीला सालीचे छोटे छोटे तुकडे करावेत. एका स्टीलच्या पातेल्यात हे तुकडे घेऊन ते बुडतील एवढ्या पाण्यात उकळत ठेवावेत. हे करत असताना तीन वेळा पाणी उकळून बदलावे.

जेली तयार करून घ्यावी. तयार जेलीमध्ये मोसंबीच्या सालीचे तीन वेळा उकळलेले तुकडे टाकावेत. तयार पदार्थ हवाबंद करून थंड व कोरड्या जागी साठवावा.

स्क्वॅश

प्रथम मोसंबीचा रस काढून, गाळून घ्यावा. स्क्वॅश बनविताना रस कमीत कमी २५ टक्के, एकूण विद्राव्य घटक ४५ टक्के आणि आम्लता ०.८ टक्का असणे आवश्‍यक आहे. या प्रमाणीकरणानुसार रस १ लिटर, साखर १.६९४ किलो, सायट्रिक आम्ल

२० ग्रॅम, पाणी १२५० मिलि,

सोडिअम बेंझोएट २ ग्रॅम या प्रमाणात वापरावे.

प्रथम साखर व पाणी एकत्र करून उकळून घ्यावे. हे द्रावण उकळत असताना येणारी मळी काढून घ्यावी. तयार झालेले पाणी व साखरेचे द्रावण थंड करून त्यामध्ये रस एकजीव करून घ्यावा.

नंतर दोन ग्लासमध्ये थोडा स्क्वॅश घेऊन एकामध्ये सायट्रिक आम्ल व दुसऱ्यामध्ये सोडिअम बेंझोएट घेऊन विरघळून घ्यावे. ते स्क्वॅशमध्ये मिसळावे.

तयार झालेला स्क्वॅश पुन्हा मलमलच्या कापडातून गाळून घेऊन निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या व थंड जागी साठवावा. स्क्वॅशपासून सरबत तयार करताना त्यामध्ये दोन ते तीन पट पाणी मिसळून थंड करून पिण्यासाठी वापरावे.

जॅम

जॅम तयार करताना पूर्ण परिपक्व झालेली निरोगी फळे निवडून, स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. फळांवरील साल, पांढरा पापुद्रा काढून स्टीलच्या चाकूने फोडींचे लहान तुकडे करून त्यातील बिया काढून टाकाव्यात.

तुकडे मिक्‍सरमध्ये फिरवून लगदा तयार करावा. प्रमाणीकरणानुसार जॅम बनविताना कमीत कमी ४५ टक्के लगदा, एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ६८ टक्के व आम्लता ०.६ ते १.० टक्का ठेवावी.

तयार झालेला जॅम रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या बरणीत भरून हवाबंद करून ठेवावा. तयार झालेला जॅम थंड व कोरड्या जागी साठवावा.

तयार झालेल्या बरणीला लेबल लावून मार्केटमध्ये विक्री करू शकतो. त्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण नोंदणी परवाना लागतो.

पोषक घटक

घटक प्रमाण (प्रति १०० ग्रॅम)

कर्बोदके ९.३

साखर १.७

फायबर ०.५

कॅल्शिअम ४०

लोह ०.७

फॉस्फरस ३०

पोटॅशिअम ४९०

जीवनसत्त्व क ५०

चरबी ०.३

प्रथिने ०.७ ते ०.८

कृष्णा काळे, ८८०५९६८५३६ (लेखक अन्नप्रक्रिया तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT