Kasa News: आदिवासी विकास विभागाच्या निर्देशानुसार राज्यातील आदिवासी भागांमध्ये रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवांचे आयोजन सुरू आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे रानभाज्या, रानफळे, वनौषधी व अन्नधान्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे. .डहाणूतील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यक्षेत्रातील पारनाका, पळसपाडा येथे रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सव उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात डहाणू, तलासरी, पालघर, वसई तालुक्यातील सुमारे ३४ महिला बचत गटांनी सहभाग घेतला..Wild Vegetables: पुरंदर किल्ल्याच्या परिसरात बहरल्या रानभाज्या.शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांची ओळख करून देत त्यांच्या पौष्टिक गुणधर्मांची माहिती महिलांनी दिली. तसेच या भाज्यांपासून बनवलेले पदार्थ चाखून पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते..Wild Vegetables : रानभाज्या महोत्सव प्रत्येक तालुक्यात व्हावा ः कोकाटे.कार्यक्रमाचे उद्घाटन सर्व महिला बचत गटांच्या अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. प्रकल्प अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला..परंपरा जपण्याचा प्रयत्न!महोत्सवामुळे नैसर्गिकरीत्या जंगलात उपलब्ध असलेल्या रानभाज्या, कंदमुळे, फळे व फुलभाज्या एका ठिकाणी उपलब्ध होऊन स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ मिळाली. हा उपक्रम स्थानिकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याबरोबरच पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.