Nanded News: केंद्र शासनाने सोमवारी (ता. ११) वितरित करण्यात आलेल्या विमा परताव्यात लोहा-कंधार विधानसभा क्षेत्रात सर्वांत कमी म्हणजे तीन कोटी ५१ लाख रुपये विमा मंजूर झाला आहे. दुसरीकडे नायगाव मतदार संघात २३ कोटी, हदगाव मतदार संघात २० कोटी, किनवटमध्ये १५ कोटी, मुखेड १४ कोटी, भोकर ४ कोटी तर शहरीकरण झालेल्या दोन्ही नांदेड मतदार संघात दोन कोटींचा परतावा मंजूर झाला आहे..पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०२४ अंतर्गत नांदेड जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांअंतर्गत ८५ हजार ५८६ अर्जदार शेतकऱ्यांना ८९ कोटी ५१ लाख ३१ हजार ५५५ रुपये विमा परतावा मंजूर झाला. केंद्र सरकारकडून सोमवारी वितरित करण्यात आलेल्या पीकविमा परताव्यानुसार, नांदेड जिल्ह्यातील काही मतदार संघांना मोठा दिलासा तर काहींना अल्प परतावा मिळाला आहे..Crop Insurance: राज्यातील शेतकऱ्यांना आणखी किती विमा भरपाई मिळणार?.विधानसभा मतदार संघनिहाय परताव्यात शहरीकरण झालेल्या नांदेड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदार संघाला सर्वांत कमी म्हणजे दोन कोटी तीन लाख रुपयांचा पीकविमा परतावा मंजूर झाला आहे. लोहा (कंधार) विधानसभा मतदार संघातील दहा हजार ८६० शेतकऱ्यांना तीन कोटी ५१ लाखांचा परतावा मंजूर झाला..तर दुसरीकडे नायगाव (धर्माबाद-उमरी) विधानसभा मतदार संघाला २३ कोटी, हदगाव (हिमायतनगर) मतदार संघाला २० कोटी, किनवट (माहूर) मतदार संघाला १५ कोटी, मुखेड मतदार संघाला १४ कोटी, देगलर (बिलोली) मतदार संघाला ६ कोटी ९२ लाख आणि भोकर (मुदखेड-अर्धापूर) मतदार संघाला ४ कोटींचा परतावा मिळाला..Crop Insurance : विमा योजनेचा भार केवळ दोन कंपन्यांच्या खांद्यावर .स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत शेतकऱ्यांना अतिवृष्टीनंतर भरपाईसाठी विमा कंपनीकडे दावे दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. इतर मतदार संघांनुसार लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात दावे दाखल केले..परंतु परतावा मंजुरीत मात्र विस्ताराने कमी असलेल्या तालुक्यांना परतावा अधिक तर तब्बल २५० पेक्षा अधिक गावे असलेल्या कंधार-लोहा तालुक्यांना मात्र या वेळी विमा कंपनीने कमी तरतावा मंजूर करून ठेंगा दाखविण्याचीच भावना व्यक्त होत आहे. .तालुकानिहाय परतावा तपशील अर्धापूर- २.६१ कोटी, भोकर- ८५ लाख, बिलोली- ३.३४ कोटी, देगलूर- ३.५८ कोटी, धर्माबाद- ४.२८ कोटी, हदगाव- १६.४२ कोटी, हिमायतनगर- ३.४९ कोटी, कंधार- २.१९ कोटी, किनवट- १०.९९ कोटी, लोहा- १.३२ कोटी, माहूर- चार कोटी, मुदखेड- ७५ लाख, मुखेड- १४.३० कोटी, नायगाव- ११.४ कोटी, नांदेड- २.३ कोटी, उमरी- ८.२६ कोटी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.