Water Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Water Conservation : ‘जलतारा’तून साताऱ्यात होणार ७५ हजार कामे

Water Resources : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २६६ कामे राबविण्यात येतात. तसेच या कामाबरोबरच आता जलतारा उपक्रम रोजगार निर्मितीबरोबर जलस्रोत पुनर्भरणासाठी सुरू करण्यात आला आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात राज्य शासनाच्या वतीने ‘जलतारा’ उपक्रम सुरू करण्यात आला असून, या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून शेतशिवारात जलताराची तब्बल ७५ हजार कामे होणार आहेत.

यामधून जिल्ह्यातील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि भूजल पातळीत वाढ होणार आहे. या कामांसाठी ३९ कोटी ३९ लाखांचा खर्च होणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २६६ कामे राबविण्यात येतात.

तसेच या कामाबरोबरच आता जलतारा उपक्रम रोजगार निर्मितीबरोबर जलस्रोत पुनर्भरणासाठी सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेसाठी ३९ कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुमारे ७५ हजार कामांचे नियोजन करण्यात आले आहे.

यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेमार्फत १४ हजार १७ जलतारा कामांना मंजुरी देण्यात आली असून, ही कामे सुरू करण्यात आली आहेत.

जिल्ह्यात जलस्रोत पुनर्भरणासाठी जलतारा हा उपक्रम सुरू झालेला आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीही जलतारा फायदेशीर आहे. हा उपक्रमाअंतर्गत कामे सुरू झाली आहेत. यामध्ये गावपातळीवर शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.
- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT