Jaggery Rate agrowon
ॲग्रो विशेष

Jaggery Rate : गुऱ्हाळ घरे कारखानदारांची करणार कोंडी? गुळाला चांगला दर, ३०० च्यावर गुऱ्हाळ घरे होणार सुरू

Jaggery Production : कोल्हापूर जिल्ह्यात गुऱ्हाळ घरे सुरू झाल्याने शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज गूळ रव्यांची मोठी आवक होत आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Jaggery Plant : कोल्हापूर जिल्ह्यात गुऱ्हाळ घरे सुरू झाल्याने शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज गूळ रव्यांची मोठी आवक होत आहे. मागच्या महिन्यात आठवड्यातून दोन वेळा होणारे सौदे आता रोज होत असल्याचे चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, यासह हातकणंगले तालुक्यातील काही गावात गुऱ्हाळ घरे सुरू झाली आहेत.

याचबरोबर एका करवीर तालुक्यात ५० गुर्‍हाळे सुरू झाली आहेत. तर पुढच्या काही दिवसात आणखी ५० गुऱ्हाळे सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे यावर्षी ३०० ते ४०० गुर्‍हाळे सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर गुळाच्या दरातही तेजी आल्याने शेतकरी गुऱ्हाळ घरांना ऊस घालण्याकडे कल देत आहेत.

यंदा गुळ हंगामाच्या सुरुवातीलाच गुळाला चांगला दर मिळत आहे. सध्या प्रति क्विंटल गुळाला ३ हजार ८०० ते ५ हजार १०० रुपये दर मिळत आहे. यामुळे यंदा गुळाचे उत्पादनही वाढण्याची शक्यता आहे. तसेच बाजार समितीकडूनही गुर्‍हाळे सुरू करण्यासाठी शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. हंगामात जास्तीत जास्त गूळ रव्यांची आवक होईल, असे नियोजन आहे. गेल्या आठ दिवसांत १ लाख २० हजार गूळ रव्यांची विक्री झाली असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून गुऱ्हाळ घरे सुरू झाली आहेत यामुळे शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळांना घालत आहे. यंदा जून पासून अत्यंत कमी पाऊस झाल्याने उसाची वाढ झाली नसल्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे यंदा उसाचे उत्पादन कमी असल्याने गुऱ्हाळ घरे आणि कारखानदार यांच्यात ऊस पळवण्याची शर्यत लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

तर दुसरीकडे साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता द्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कारखाने सुरू होण्यास विलंब लागू शकतो. तोपर्यंत उसाचे रान मोकळे करण्यासाठी अनेक शेतकरी ऊस गूळ उत्पादनासाठी घालू शकतो.

मागच्या चार दिवसांत कोल्हापूर जिल्हा बाजार समितीत २१ हजार गूळ रव्यांची, तर ५ हजार बॉक्सची आवक झाली. यामध्ये ३ हजार ८०० पासून ते ५ हजार १०० रुपयांपर्यंत गुळाला क्विंटलमागे दर मिळाला. यामध्ये एकाच दिवशी ८० टक्के गुळाची विक्री झाली.

तर शुक्रवारी (ता.२७) २८ हजार रवे व ७ हजार बॉक्सची आवक झाली, त्याचा दर सरासरी ४ हजार ९०० रुपये मिळाला तर (ता.२८) ३० हजार रवे आणि ९ हजार बॉक्सची आवक झाली. यावेळी यंदाचा उच्चांकी दर ५ हजार १०० रुपये झाला. या प्रमाणात दररोज गुळाची आवक होत आहे. अडत दुकानात गूळ शिल्लक राहत नसल्याने गुळाला चांगली मागणी असल्याचे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT