Organic Jaggery Benefits : सेंद्रिय गुळाचे असे आहेत फायदे

sandeep Shirguppe

सेंद्रिय गुळ

सध्या सेंद्रिय गुळाची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे सेंद्रिय गुळ खरेदी करून खाणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे

Organic jaggery | agrowon

सेंद्रिय गुळ कसा ओळखावा

परंतु सेंद्रिय गुळ कसा ओळखावा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अनेकजण गुळ खरेदी करताना फसतात. यामुळे सेंद्रीय गुळ कसा ओळखावा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

Organic jaggery | Agrowon

सेंद्रिय उसापासून सेंद्रिय गुळ

सेंद्रिय गूळ बनवताना यामध्ये कोणतेही रसायन वापरले जात नाही, यामुळे हा गुळ अधिक गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी सेंद्रिय शेती केलेला ऊस वापरला जातो

Organic jaggery | Agrowon

केमिकल गुळाची चव वेगळी

केमिकल वापरलेला गुळ हा आरोग्यासाठी उपयुक्त नसल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. केमिकल्सचा वापर प्रामुख्याने गुळाची चव, रंग आणि गुळ अधिक काळ टिकावा यासाठी केला जातो.

Organic jaggery | Agrowon

केमिकल गुळात गंधकाचा वापर

गुळाला अधिक पिवळा रंग येण्यासाठी गंधक पावडर (सल्फर पावडर) मिसळली जाते यामुळे गुळाच्या पिवळ्या रंगावर न भाळता थोडा काळसर असलेला सेंद्रिय गुळचखाण्यासाठी वापरला पाहिजे.

Organic jaggery | Agrowon

सेंद्रिय गुळात पोषक तत्वे

सेंद्रिय गुळामध्ये आवश्यक असणारे अनेक पोषक घटक असतात.सेंद्रिय गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम,मॅगनीज, विटामिन बी, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखे अनेक महत्त्वाचे पोषक तत्वे असतात.

Organic jaggery | Agrowon

हिमोग्लोबिन वाढवते..

सेंद्रिय गुळातलोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढण्यास मदत होते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ॲनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी एनिमिया दूर करण्यासाठी सेंद्रिय गुळ खाणे फायदेशीर असते.

Organic jaggery | Agrowon

रक्तदाब नियंत्रित ठेवतो

सेंद्रिय गुळ खाण्यामुळे ब्लड प्रेशर योग्य ठेवण्यास मदत होते. कारण गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.

Organic jaggery | Agrowon
aluchi pane | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...