Soybean Farming Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Farming Issue : सोयाबीन पेरण्यापेक्षा शेती विकून पैसे बँकेत ठेवणे फायदेशीर

Farmer Issue : यंदा शेतकरी अनेक समस्यांना सामोरा जात असून त्याची उद्विग्नता वाढली आहे. सोयाबीन पेरल्यापेक्षा शेती विकून पैसे बँकेत ठेवले तर परवडू शकते, अशा शब्दांत शेतकरी भावना मांडत आहेत.

Team Agrowon

Akola News : काही वर्षांपूर्वी सोयाबीन म्हणजे एकदम सोयीचे पीक. फारसे व्यवस्थापन न करताही हमखास उत्पादन मिळवून देणारी ही पीकपद्धती होती. पण आता सोयाबीन हे अनेक शेतकऱ्यांना नकोसे झाले आहे. मात्र सक्षम पर्याय नसल्याने आजही खरिपात सार्वत्रिक सोयाबीन, तूर अशी पीकपद्धती कायम आहे. यंदा शेतकरी अनेक समस्यांना सामोरा जात असून त्याची उद्विग्नता वाढली आहे. सोयाबीन पेरल्यापेक्षा शेती विकून पैसे बँकेत ठेवले तर परवडू शकते, अशा शब्दांत शेतकरी भावना मांडत आहेत.

यंदा सोयाबीनचे पीक सुरुवातीला चांगले होते. जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यांत सतत पाऊस झाला. पाऊस नसेल तर ढगाळ वातावरण होतेच. पिकाला पुरेसा सूर्यप्रकाशच मिळाला नाही. यामुळे काही सोयाबीन वाणांची कायिक वाढ भरमसाट झाली. काही वाणांची वाढ झाली नसली तरी तुलनेने शेंगांची संख्या त्यावर कमी लागली.

नंतर सोयाबीन काढणीच्या शेवटच्या पंधरा दिवसांत पिकात अचानक बदल दिसून आले. टप्प्याटप्प्याने ‘येलो मोझॅक’ वाढला. काही ठिकाणी सोयाबीन आपोआप सुकून गेल्याच्याही शेतकऱ्यांच्या तक्रारी येत होत्या. आता सार्वत्रिक कापणी सुरू झाली. या कापणीसाठी सर्वच ठिकाणी मजुरांची मोठी उणीव यंदा भासते आहे. सोयाबीनचा हंगाम यंदा मध्य प्रदेश तसेच विदर्भातील गोंदिया, भंडारा व इतर जिल्ह्यांतील आदिवासी मजुरांच्या भरवशावर सुरू आहे. कुठे एकरी साडेतीन हजार, तर कुठे हाच कापणीचा दर ३८०० ते ४००० रुपयेसुद्धा असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

मळणीचा दर क्विंटलला दोनशे रुपये एवढा झालेला आहे. यानंतर शेतीपासून घरापर्यंत वाहतूक, हमालीचा खर्च वेगळा येत आहे. दुसरीकडे बाजारात सोयाबीन साधारणपणे चार हजारांपासून विकते आहे. सर्वाधिक माल याच दराने मागितला जातो आहे.

सोयाबीनला लागणारा एकरी खर्च

पेरणी - ७०० रुपये, बियाणे २०००, रासायनिक खत १७५०, तणनाशक फवारणी ११००, कीटक नाशक फवारणी २५००, कापणी ३५०० ते ४०००, काढणी २०० रुपये क्विंटल (एकरी ५ पोते झाल्यास १००० रुपये खर्च), निंदण व इतर मजुरी २५०० एकूण १५०००

मी गेल्या १० ते १२ वर्षांपासून शेती करीत आहे. मागील काही वर्षांत खरीप हंगामाचे स्वरूप बदलत चालले आहे. यंदा अचानक तापमानात बदल झाला. सोयाबीनवर रसशोषण करणारी कीड, पांढरी माशी आली. यामुळे पिकाचे शेवटच्या टप्प्यात मोठे नुकसान झाले. विद्यापीठ, कंपन्यांकडून कीडरोधक वाणांचे जे दावे केलेले होते ते फोल ठरले. सर्व वाण किडीने ग्रस्त झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी मला जेथे ९ ते १० उतारा मिळाला तेथे या वर्षी ५ ते ६ क्विंटलपर्यंत उतारा घसरला आहे. विशेष म्हणजे स्थानिक मजूरटंचाई असल्याने यंदा गोंदिया जिल्ह्यातून मजूर आणले. त्यांच्याकडून एकरी ३५०० रुपये दराने सोंगणी केली. उत्पादन खर्च वाढ आणि बाजारातील दर पाहले तर सोयाबीनचे पीक तोट्याचा सौदा बनले आहे.
विनोद देशमुख, शेतकरी, सवडद, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा
तीन एकरांत पेरणी केली होती. सोंगणीला एकरी तीन हजार दिले. काढणीचा खर्च दोन हजार लागला. मळणी केली असता एकरी दीड क्विंटलपर्यंत उतारा लागला. सततच्या पावसाने पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादन खर्चही घरातून करावा लागला आहे.
राजेश इस्तापे, शेतकरी, बोर्डी, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT