Pomegranate Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Farming: निमगाव दुडेतील डांंळिंब बागेला इस्राईलच्या तज्ज्ञांची भेट

Israeli Experts: निमगाव दुडे (ता. शिरूर) येथील डाळिंब बागेला इस्राईल देशातील तज्ज्ञांनी भेट देऊन बागेची पाहणी केली. येथील शेतकरी नवनाथ हजारे यांच्याशी संवाद साधून डाळिंब उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Team Agrowon

Takali Haji News: निमगाव दुडे (ता. शिरूर) येथील डाळिंब बागेला इस्राईल देशातील तज्ज्ञांनी भेट देऊन बागेची पाहणी केली. येथील शेतकरी नवनाथ हजारे यांच्याशी संवाद साधून डाळिंब उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

टाकळी हाजी येथील बेट भागात मुरबाड व डाळिंब योग्य शेत जमीन असून त्यामधे जमिनीत डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. कांद्याचे आगार समजला जाणारा हा भाग डाळिंब उत्पादनातदेखील अग्रेसर ठरला आहे.

या भागातून दरवर्षी हजारो टन डाळिंब निर्यात केले जाते. त्यामुळे या भागातील डाळिंब बाग पाहण्यासाठी अनेक लोक सातत्याने असतात. इस्राईल येथील तज्ज्ञ एली ॲमॉन, इलाना फहीमा, ड्रेफस यांनीही येथील शेतकऱ्यांची यशोगाथा ऐकून येथे भेट दिली.

त्यांच्यासमवेत अनंत कुलकर्णी, विनोद कुमार, संजय बिराजदार, अंबुज जैन, तपस्वी शरण, राहुल कोळगे यांनी डाळिंब बागेची पाहणी केली. त्यांना डाळिंब मार्गदर्शक दत्ता कांदळकर व किरण कांदळकर यांनी उत्पादनाबाबत माहिती दिली.

या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांचे कौतुक करीत भारतीय शेतकऱ्यांनी इस्राईलप्रमाणे प्रगत तंत्राचा वापर करून शेती उत्पादन करण्यास मोठा वाव असल्याचे सांगितले. या वेळी डाळिंब उत्पादक शेतकरी नवनाथ हजारे, डॉ. अरुण थोरात, संतोष घोडे, किशोर बारहाते, विलास घोडे, साळभाऊ पानगे, बाळु साळवे, महेश बढे, सोमनाथ वागदरे, शंकर येडे या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune ZP: पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे

Wheat Harvesting: पुणे विभागात गहू काढणीला वेग

Agriculture Department: तंत्र अधिकारी संवर्गात ठेवणे अन्यायकारक ठरेल

Talathi Bribery Case: लाचखोर तलाठ्याला सात वर्षांची सक्तमजुरी

Fruit Farming Workshop: सीताफळाचे भवितव्य ठरविण्यासाठी पुण्यात कार्यशाळा

SCROLL FOR NEXT