Wheat Farmers Maharashtra: रब्बी हंगामातील गव्हाच्या काढणीला पुणे विभागात गेल्या पंधरा दिवसांपासून वेग आला असून, अनेक तालुक्यांत शेतकरी काढणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र मजूरटंचाईची समस्या तीव्र होत असल्याने वाढीव मजुरी देऊन काढणी करावी लागत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा ओढा आता ‘हार्वेस्टर’ यंत्रांकडे वाढत असल्याचे चित्र दिसत आहे..यंदा गव्हाच्या पेरणीस सुरुवातीला अनुकूल हवामान उशिरा तयार झाले. तरीही पाण्याची उपलब्धता आणि थंडीची साथ मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी गहू पिकाला प्राधान्य दिले. विभागातील सरासरी २.१९ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यंदा सुमारे २.७५ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, हे प्रमाण १२६ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे..सध्या पीक पक्व अवस्थेत आले असून, काढणी अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणी काढलेला गहू मशीनच्या साहाय्याने मळणी आणि प्रतवारीसाठी प्रक्रियेत आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..Wheat Harvesting Tips: गव्हाची काढणी, मळणी आणि साठवण करताना काय काळजी घ्याल?.पारंपरिक पद्धतीत गहू काढणीसाठी सोंगणी, पेंढ्या बांधणे आणि मळणी यासाठी मजुरांना एकरी दोन पोती गहू द्यावे लागतात. त्याशिवाय मळणी यंत्राचा खर्च वेगळा असतो. याउलट, हार्वेस्टरद्वारे अवघ्या अर्ध्या तासात काढणी पूर्ण होत असल्याने वेळ आणि पैशांची बचत होत आहे. गव्हाच्या भुसाचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी होत असल्याने काही शेतकरी भुसासाठी स्वतंत्र व्यवहार करतात. सरासरी एकरी १५ ते १८ पोती उत्पादन मिळत असल्याचे शेतकरी सांगतात..दरम्यान, उजनी धरण क्षेत्रासह विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने यंदा गव्हाचे क्षेत्र वाढले. मात्र काढणीदरम्यान मजूरटंचाई आणि वाढलेला खर्च ही मोठी आव्हाने ठरत आहेत..Wheat and Chana Harvesting: खानदेशात गहू, हरभरा काढणीस वेग.यंत्रामुळे वेळ आणि मेहनतीची बचतपारंपरिक पद्धतीने एक एकर गहू काढण्यासाठी १० ते १२ मजूर लागतात. त्यासाठी ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. तर हार्वेस्टरमुळे अवघ्या अर्ध्या तासात काढणी पूर्ण होत असून खर्चही तुलनेने कमी येतो..खर्चाचा वाढता बोजाहार्वेस्टर दर एकरी २,००० ते ३,००० रुपयेभुस्सा हवे असल्यास एकरी ६,००० रुपयांपर्यंतमहिला मजूर मजुरी २५० ते ३०० रु. प्रतिदिनपुरुष मजूर मजुरी ४०० रु. प्रतिदिनपारंपरिक काढणी खर्च एकरी ४,००० ते ५,००० (मळणी वेगळी).पूर्वी गहू काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर आणि मेहनत लागत होती. त्यामुळे अनेक शेतकरी गहू पिकाकडे दुर्लक्ष करत. आता यांत्रिकीकरणामुळे कमी वेळेत आणि कमी मेहनतीत काढणी होत असल्याने हार्वेस्टरला सर्वांची पसंती मिळत आहे.विलास शिंदे, शेतकरी, मलठण (शिरूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.