Irrigation Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Management : सिंचन व्यवस्थापन बदलत्या वातावरणाशी सुसंगत हवे

Agriculture Irrigation : यावेळी डॉ. व्ही. एन. शारदा यांनी जलसिंचनाच्या पाण्याचा वापर करताना पृष्ठभागावरील पावसाचे पाणी, प्रवाही कॅनॉलचे पाणी, शेततळ्यातील पाणी व भूगर्भातील पाणी यांचे एकात्मिक कार्यक्षम वापरासंबंधी मार्गदर्शन केले.

Team Agrowon

Nagar News : शेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा विषय दिवसेंदिवस जटिल बनत आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन आवश्यक असून भविष्यातील सिंचन पाणी व्यवस्थापन हे बदलत्या वातावरणाशी सुसंगत असावे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.

अखिल भारतीय समन्वित जलसिंचन व्यवस्थापन प्रकल्पातील भारताच्या पश्चिम विभागातील प्रमुख शास्त्रज्ञांची पंचवार्षिक संशोधन आढावा बैठक महात्मा फुले कृषी विद्यापीठात झाली. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी सदस्य डॉ. व्ही. एन. शारदा, आंध्रप्रदेशातील सी. व्ही. रमण वैश्विक विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पांडा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. यु. एम. खोडके, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, भुवनेश्वर येथील भारतीय जलसिंचन व्यवस्थापन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. एस. मोहंती आंतरविद्या जलव्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. मुकुंद शिंदे व कृषी विद्या विभाग प्रमुख तथा जलव्यवस्थापन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत बोडके उपस्थित होते.

यावेळी डॉ. व्ही. एन. शारदा यांनी जलसिंचनाच्या पाण्याचा वापर करताना पृष्ठभागावरील पावसाचे पाणी, प्रवाही कॅनॉलचे पाणी, शेततळ्यातील पाणी व भूगर्भातील पाणी यांचे एकात्मिक कार्यक्षम वापरासंबंधी मार्गदर्शन केले. त्यांनी देशातील विविध राज्यातील पाणी लवादाच्या गांभीर्याविषयी संबोधन करुन प्रत्येक प्रकल्पाला कृषी पर्यावरणीय हवामान विभागानुसार पीक व पाणी नियोजन करण्याचे आवाहन केले.

डॉ. एस.एन. पांडा यांनी पाण्याची गुणवत्ता व संवेदन तंत्र आधारित पाणी व्यवस्थापन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. यु.एम. खोडके यांनी आपल्या मनोगतात पाणी व्यवस्थापनाच्या आधुनिक सिंचन प्रणालीच्या वापराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते राहुरी येथील जलसिंचन प्रकल्पातील शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद पोपळे, डॉ. अनिल दुरगुडे आणि डॉ. प्रशांत बोडके लिखित जलसिंचन प्रकल्पातील सर्व शिफारशींचे माहिती पुस्तिका व नवसारी गुजरात येथील जलसिंचन प्रकल्पातील शास्त्रज्ञ डॉ. एन. जी. सावंत, डॉ. एस. एल. पवार व डॉ. व्ही. आर. नाईक लिखित ऊस आणि केळी या पिकांची उत्पादकता वाढविण्याविषयी जलव्यवस्थापन तंत्रज्ञान पुस्तिका यांचे विमोचन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT