Agriculture Irrigation : तेरणाच्या बंद कालव्यांतून मिळणार पाणी

Rabi Season : चौदा वर्षांपासून बंद असलेल्या तेरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून यंदा रब्बी हंगामात पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : चौदा वर्षांपासून बंद असलेल्या तेरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून यंदा रब्बी हंगामात पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. रब्बी हंगामासाठी दोन्ही कालव्यांतून आवर्तन सोडण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कालव्यांवर अवलंबून असलेल्या १६५२ हेक्टर सिंचन क्षेत्रातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटण्याची चिन्हे आहेत.

आतापर्यंत दुरुस्तीचे सरासरी ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यात डाव्या कालव्याचे ६० टक्के, तर पावसाचा अडथळा आणि इतर अडचणींमुळे उजव्या कालव्याच्या दुरुस्तीचे बरेच काम होणे बाकी आहे. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कालव्यांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ५१ लाख रुपयांच्या कामांचे कार्यारंभ आदेश २३ जानेवारी रोजी देण्यात आले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी दीड वर्षाची मुदत दिलेली असून ती जून २०२५ मध्ये संपणार आहे. हे काम ‘दिवेकर इन्फ्रा बारामती’ या कंत्राटदाराकडे आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : शिरसाई सिंचन योजनेतून खरीप हंगामासाठी आवर्तन

डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात तेर, पानवाडी, रामवाडी, भंडारवाडी ही चार गावे, तर उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात तेर, वानेवाडी, इरला, भंडारवाडी, राजूरी ही पाच गावे आहेत. दोन्ही कालव्यांवर सिंचन होणारे एकूण क्षेत्र १६५२ हेक्टर आहे. हे कालवे १९६८ मध्ये बांधून तयार झाले. त्यांनतर २०११ पर्यंत कालव्यांतून पाणी सोडण्यात आले होते.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation Sector : सिंचन क्षेत्र सुधारणांची भ्रूणहत्या

दरम्यान, कालव्यांऐवजी २००७ मध्ये बंद पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला. त्यावर ३२ कोटींचा खर्च करण्यात आला. मात्र, तांत्रिक दोषांमुळे पाणी शेतापर्यंत पोचू न शकल्याने हा प्रकल्प यशस्वी होऊ शकला नाही. आता तांत्रिक दोष शोधून हा पथदर्शी प्रकल्प पुन्हा नव्याने सुरू करण्याची कार्यवाही जलसंपदाच्या उपसा सिंचन विभागाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

कालव्यांतील एकूण कामांचे स्वरूप...

 झाडेझुडपे, गाळ काढणे

 गेटची दुरुस्ती

 जुन्या बांधकामांची डागडुजी

 बाजू भरण्याची माती कामे

 आवश्यक ठिकाणी काँक्रीट लाइन करणे

दोन्ही कालव्यांतील साफसफाईची कामे जवळपास ९० टक्के पूर्ण झाली आहेत. दोन किलोमीटरची साफसफाई राहिली आहे. डाव्या कालव्यातील गाळ पूर्णपणे काढण्यात आला आहे. बाह्य गेटची बांधकामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना चौदा वर्षांनतर पहिल्यांदाच रब्बीत आवर्तन देण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू आहेत.
- धनंजय वरपे, शाखा अभियंता, तेरणा मध्यम प्रकल्प, तेर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com