Agriculture Irrigation :समांतर जलवाहिनीमुळे उजनीतून शेतीला एक आवर्तन जादा मिळणार

Ujani Dam : सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. या जलवाहिनीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
Ujani Dam Water
Ujani Dam Wateragrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. या जलवाहिनीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या जलवाहिनीमुळे दरवर्षी शहरासाठी भीमा नदीतून सोडावे लागणाऱ्या जवळपास २२ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे, त्यामुळे आगामी उन्हाळ्यात शेतकऱ्यांना एक आवर्तन जास्त मिळण्याची शक्यता आहे.

दरवर्षी साधारणतः १० फेब्रुवारीपासून शेतीसाठी पहिले आवर्तन सोडले जाते. तत्पूर्वी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी वाटपाचे नियोजन निश्चित होते. दरवर्षी योजनेतून रब्बी हंगामात जानेवारी महिण्यात शेतीसाठी पाणी सोडलं जात, पण यंदा चांगला पाऊस झाल्याने फेब्रुवारीत हे आवर्तन सुटेल.

Ujani Dam Water
Agriculture Irrigation : रब्बीसाठी सिंचन प्रकल्पांतून मिळणार पाणी

दुसरीकडे दरवर्षी सोलापूर शहरासाठी उन्हाळ्यात उजनी धरणातून प्रत्येक १५ दिवसातून एकदा भीमा नदीत पाणी सोडले जाते. पण आता समांतर जलवाहिनी टाकली जात असून, नोव्हेंबर अखेर हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर पुढील उन्हाळ्यात भीमा नदीतून पाणी सोडणे बंद होईल ते पण नव्याने सुरू होणाऱ्या उपसा सिंचन योजना शेतीसाठी वापरले जाईल.

Ujani Dam Water
Agriculture Irrigation : तेरणाच्या बंद कालव्यांतून मिळणार पाणी

धरणाच्या आठमाही नियोजन असते तरीदेखील गरजेनुसार शेतीसाठी एक आवर्तन जादा सोडण्याची शक्यता आहे. शहरासाठी नदीतून पाणी सोडावे लागत असल्याने धरणाची पाणी पातळी घटते आणि कॅनॉलमधून पाणी लवकर सोडावे लागते. धरण पंधरा ते वीस टक्के झाल्यावर कॅनॉलमधून पाणी सोडता येत नाही.

आता भीमा नदीतून पाणी सोडणे बंद होत असल्याने अशी वेळ येणार नाही शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार पाणी सोडणे शक्य होईल त्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीत निश्चित होईल.

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी समांतर दुसरी जलवाहिनी टाकली जात आहे. त्यानंतर भीमा नदीतून प्रत्येक वेळी पाणी सोडणे बंद होणार आहे. त्यामुळे पाणी नियोजन करणे सोयीचे होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com