Pune News: कापसावरील ११ टक्के आयात शुल्क काढल्यामुळे देशात कापसाचे भाव नरमले आहेत. सध्या बाजारात शेतकऱ्यांचा कापूस येत नाही. मात्र सीसीआयच्या कापसाचे भाव तसेच हजार बाजारातील खरेदीचे भावही कमी झाले. सुताचे दरही किलोमागे २ ते ३ रुपयाने नरमले. .केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत देशातील बंदारांवर येणाऱ्या कापसावरील ११ टक्के आयात शुल्क काढले आहे. आयात शुल्क असतानाही यंदा देशात कापसाची विक्रमी आयात झाली. ३१ जुलैपर्यंत ३३ लाख गाठी कापूस आयात झाला. यापूर्वी २०२२-२३ च्या हंगामात सर्वाधिक ३१ लाख गाठी आयात झाली होती. यंदा १० महिन्यांतच हा विक्रम मोडीत निघाला..Cotton Rate: कापूस दर नरमले; तसेच काय आहेत केळी, गहू, गवार आणि मका कणसाचे आजचे बाजारभाव .आयातवाढीवर मर्यादासध्या ब्राझीलमध्ये कापसाची काढणी सुरू झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची उपलब्धता आहे. ब्राझील आणि आफ्रिकेतील देशांमधून आयात वाढू शकते. मात्र ब्राझील आणि आफ्रिकेतील देशांमधून भारतात कापूस आणण्यासाठी किमान ४० ते ४५ दिवस लागतील. त्यामुळे या देशांमधून आयातवाढीवर मर्यादा आहेत..कोलंबो, सिंगापूर आणि मलेशियातून आयात लवकर होऊ शकते. काही भारतीय कंपन्यांनी या ठिकाणी कापूस ठेवलेला आहे, तोही आयात होईल. आयात शुल्क काढण्याआधी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत ६ लाख गाठींपर्यंत आयात होईल, असा अंदाज होता. आता या दोन्ही महिन्यांतील आयात ९ लाख गाठींपर्यंत जाऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले..India Cotton Import: कापूस आयातीवरील शुल्क हटवले.उद्योगासोबत शेतकऱ्यांचाही विचार व्हावादेशात ३० सप्टेंबरपर्यंत कापसाची आयात अपेक्षेपेक्षा जास्त वाढणार नाही हे खरे असले तरी यंदा आयात विक्रमी होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी आहेत. अमेरिकेच्या ५० टक्के आयात शुल्कामुळे कापड निर्यातीवर मोठा परिणाम होणार आहे. उद्योगांना दिलासा देण्यासाठी आयात शुल्क काढले, त्याच प्रमाणे कापड निर्यातीसाठी सरकारने अनुदानही द्यावे..कापड निर्यात झाली नाही तर देशातच कापसाचा वापर कमी होईल आणि दर नरमतील. आयात वाढल्याने दरावर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांचा कापूस ऑक्टोबरपासून बाजारात येईल. तेव्हा मात्र शेतकऱ्यांचाही विचार सरकारने करावा. हमीभावाने कापसाची खरेदी वेळेत सुरू करून इच्छूक सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत..दरावर परिणामकापूस आयात शुल्क हटविल्यामुळे देशात कापूस, सुताचे दरही कमी झाले आहेत. सीसीआयच्या कापूस विक्रीचे दर मंगळवारी खंडीमागे ६०० रुपयांनी आणि बुधवारी ५०० रुपयांनी कमी केले. दोन दिवसांमध्ये सीसीआयच्या कापसाचे भाव खंडीमागे ११०० रुपयांनी कमी झाले आहेत. एक खंडी ३५६ किलो रुईची असते. तर हजर बाजारातील भावही १५०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. भावात आणखी नरमाई येऊ शकते. कमी गुणवत्तेचा कापूस स्वस्त होऊ शकतो. सुताचे भावही किलोमागे २ ते ३ रुपयांनी कमी झाले आहेत. कापड उद्योगाला दिलासा मिळत आहे, असे उद्योगाचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.