Agriculture Irrigation : टेंभूच्या लाभक्षेत्रानजीक उंचीवरच्या १५०० हेक्टर शेतीला मिळणार पाणी

Tembhu Irrigation Scheme : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळते. मात्र,तालुक्यातील अपशिंगे, कोतवडे, रायगाव, शाळगाव तसेच कराड तालुक्यातील शामगाव, पाचुंद या उंचावरील गावे टेंभूच्या योजनेपासून वंचित होते.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Sangli News : टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रानजीक असलेली कडेगाव तालुक्यातील अपशिंगे, कोतवडे, रायगाव, शाळगाव तसेच कराड तालुक्यातील शामगाव, पाचुंद या उंचावरील पाण्यापासून वंचित असलेल्या गावांतील शेतीला पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून शासन मान्यता दिली आहे. त्यामुळे १५०० हेक्टरवरील शेतीला पाणी मिळण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळते. मात्र,तालुक्यातील अपशिंगे, कोतवडे, रायगाव, शाळगाव तसेच कराड तालुक्यातील शामगाव, पाचुंद या उंचावरील गावे टेंभूच्या योजनेपासून वंचित होते. या गावांना पाणी मिळावे यासाठी आमदार विश्वजित कदम यांनी मागणी केली. तसेच याबाबात शासन स्तरावर पाठपुरावाही केला.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : रब्बीसाठी सिंचन प्रकल्पांतून मिळणार पाणी

त्यानुसार वंचित १५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्यासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठीही सर्वेक्षण पूर्ण झाले. प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळ (पुणे) यांच्याकडून मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला जलसंपदाकडून शासन मान्यता देण्यात आली आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation :समांतर जलवाहिनीमुळे उजनीतून शेतीला एक आवर्तन जादा मिळणार

कडेगाव तालुक्यातील अपशिंगे, कोतवडे, रायगाव व शाळगाव येथील उंचावर असलेल्या ६१५ हेक्टर जमिनीस बंदिस्त पाइपद्वारे टेंभूच्या टप्पा दोन येथून पाणी उचलण्यात येऊन जमीन सिंचनाखाली येणार आहे.

टेंभूपासुन वंचित असलेल्या या १५०० हेक्टरला टेंभूतून पाणी द्यावयाचे झालेस टेंभू प्रकल्पाचे टप्पा क्र. २ प्रमाणे शिवाजीनगर (ता. कडेगाव) तलावात सोडून व तेथून १४५ मीटर उचलून स्वतंत्र योजनेद्वारे क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. या लाभ क्षेत्रातील गावांतील एकूण एक हजार ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून ०.४१ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. उंचावरील भागात पाणी देण्याच्या प्रस्तावाला शासन मान्यता मिळाली आहे.

या भागातील गावांना योजनेचे पाणी देण्यासाठी कार्यक्षेत्र सर्वेक्षण, तांत्रिक मान्यता प्रस्ताव व निविदा निघतील. प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.
- राजन रेड्डीयार, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा जलसिंचन योजना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com