Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Quality Control Department : गैरव्यवहाराची पाळेमुळे गुणनियंत्रण विभागात

Malpractices in Quality Control Rooms : राज्याच्या सर्व गुणनियंत्रण कक्षांमधील गैरव्यवहाराची पाळेमुळे निविष्ठा व गुणनियंत्रण विभागात असल्याचे निविष्ठा उद्योगातून सांगितले जात आहे.

Team Agrowon

Pune News : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील एका लाचखोर गुणनियंत्रण निरीक्षकाला अटक झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. मात्र, राज्याच्या सर्व गुणनियंत्रण कक्षांमधील गैरव्यवहाराची पाळेमुळे निविष्ठा व गुणनियंत्रण विभागात असल्याचे निविष्ठा उद्योगातून सांगितले जात आहे.

पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील (जेडीए) गुणवत्ता नियंत्रण कक्षाचे तंत्र अधिकारी दत्ता नारायण शेटे यांना एका निविष्ठा उत्पादक कंपनीकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना १९ ऑक्टोबरला सोलापूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ‘‘खते, कीटकनाशके व बियाणे या मुख्य निविष्ठांचे उत्पादन आणि पुरवठा साखळीत गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. गुणवत्तेशी तडजोड केल्यास थेट शेतकऱ्याच्या उत्पन्नाशी परिणामी त्याच्या जिवाशी खेळण्याचे प्रकार घडतात.

त्यामुळे गुणनियंत्रण विभागाचा कायदेशीर वचक अत्यावश्यक आहे. मात्र आमच्यावर कायद्यापेक्षाही वसुली तंत्राचा वचक जास्त आहे. तालुका, जिल्हा किंवा विभागातील गुणनियंत्रणाच्या साऱ्या वसुली यंत्रणा निविष्ठा उद्योगाला छळतात. या लाचखोर यंत्रणेची सूत्रे कृषी आयुक्तालयातूनच हलविली जातात,’’ अशी माहिती एका नामांकित कंपनीच्या संचालकाने दिली.

कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागात कायदेशीर कामकाज व पारदर्शकतेला थारा राहिलेला नाही. मुळात, मोठमोठी बोली लावून गुणनियंत्रणमधील मोक्याची पदे बळकावण्याची स्पर्धा अधिकाऱ्यांमध्ये लागली आहे. त्यामुळे बदलीसाठी टाकलेल्या रकमा थेट निविष्ठा उद्योगातून वसूल केल्या जात आहेत. त्यातून निविष्ठा उद्योगातील काळेधंदे आणखी वाढत आहेत, अशा शब्दांत या संचालकाने नाराजी व्यक्त केली.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या घटनेलादेखील गुणनियंत्रण विभागातील पदे बळकावण्यासाठी लागलेली स्पर्धा कारणीभूत आहे. तत्कालीन कृषिमंत्र्याच्या वर्तुळाशी जवळीक साधून या अधिकाऱ्याने पुण्याच्या जेडीए कार्यालयातील गुणनियंत्रण कक्षाचे प्रमुखपद मिळवले होते. त्याच्या हाताखाली आणखी दोन विभागीय गुणनियंत्रण कृषी अधिकारी कार्यरत होते.

राज्याच्या जेडीए कार्यालयातील गुणनियंत्रणचा तंत्र अधिकारी व दोन्ही कृषी अधिकारी संबंधित सहसंचालक व त्याच्या अखत्यारित असलेल्या अधीक्षक कृषी अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार कामे करीत असतात. याशिवाय कृषी आयुक्तालयातील गुणनियंत्रण मिळालेल्या सूचनेनुसार देखील सदर अधिकारी धाडी टाकत असतात. मात्र, लाचखोरीत पकडण्यात आल्यानंतर जेडीए किंवा आयुक्तालयातील वरिष्ठांचे लागेबांधे कधीही उजेडात येत नाहीत, असे निविष्ठा उद्योगातील प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

‘निरीक्षकांना जीपीएस लावा’

कृषी आयुक्तालयातील गुणनियंत्रण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने क्षेत्रिय पातळीवर होत असलेल्या लाचखोरीत आयुक्तालयाची काहीही भूमिका नसल्याचा दावा केला. ‘‘राज्यातील बहुतेक निरीक्षक आम्हाला न विचारता परस्पर तपासणी, धाडी, चौकशा करण्याची कामे करतात. परस्पर तडजोडी करतात आणि अटक झाल्यावर बदनामी आमची होते. त्यामुळे गुणनियंत्रणमधील प्रत्येक निरीक्षकाला जीपीएस ट्रॅकर बसवावे तसेच त्याच्या कामाची माहिती रोज आयुक्तालयात सादर करणारी प्रणाली विकसित करावी,’’ असेही या अधिकाऱ्याने सुचविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Agriculture : शेती : व्यवसाय की समाजसेवा?

Milk Revolution : दुग्ध संस्थांच्या बळकटीसाठी श्वेतक्रांती २.०

Chili Value Chain : ‘कृषक स्वराज्य’ने उभारली मिरचीची मूल्यसाखळी

Maharashtra Assembly Election 2024 : छाननीत ९१७ अर्ज अवैध; लोकसभेच्या तुलनेत राज्यात ५० लाख मतदारांची भर

Spices Business : ‘चटका जिभेचा, मसाला आमचा’

SCROLL FOR NEXT