रशियात उभारणार भारताचा पहिला युरिया प्रकल्पचीनच्या निर्यात निर्बंधांनंतर उचलले मोठे पाऊलभारतातील तीन कंपन्यांच्या सहकार्याने प्रकल्प सुरु करण्याची तयारी.India Urea Plant in Russia: देशातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात युरियाची टंचाई जाणवली. आता रब्बी हंगामातही खतांच्या पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारताने रशियामध्ये आपला पहिला युरिया उत्पादन प्रकल्प सुरु करण्याची तयारी केली आहे. देशात खतांचा पुरेसा पुरवठा व्हावा आणि जागतिक किमतीच्या परिणामाची जोखीम कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. .'इकॉनॉमिक टाईम्स'च्या वृत्तानुसार, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायजर्स (RCF), नॅशनल फर्टिलायजर्स लिमिटेड (NFL) आणि इंडियन पोटॅश लिमिटेड (IPL) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प उभारला जाणार आहे. रशियात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायू आणि अमोनियाचे साठे आहेत. त्याचा वापर या प्रकल्पासाठी केला जाईल. कारण भारतात या प्रमुख कच्च्या मालाची कमतरता आहे. .Urea Shortage : राज्यात युरियाचा साठा ५ वर्षांतील निच्चांकी पातळीवर, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे केंद्राला पत्र.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान या प्रकल्पाची घोषणा केली जाऊ शकते. ज्यामुळे भारत-रशिया यांच्यातील द्विपक्षीय आर्थिक सहकार्याचा एक मोठा नवा अध्याय सुरू होईल..Urea Shortage : युरियाचा कमी वापर करा, ८०० रुपये मिळवा, आंध्र प्रदेशला असा निर्णय का घ्यावा लागला?.आरसीएफ, एनएफएल आणि आयपीएलकडून या प्रकल्पासाठी पायाभूत कामे सुरू करण्यासाठी आधीच रशियन कंपन्यांसोबत नॉन-डिस्क्लोजर करार (एनडीए) करण्यात आले आहेत. या प्रकल्पात दरवर्षी सुमारे २० लाख टन युरियाचे उत्पादन अपेक्षित असल्याचे सांगण्यात येते. सध्या या प्रकल्पासाठी जमीन, नैसर्गिक वायू, अमोनियाची किंमत निश्चित करणे आणि वाहतूक व्यवस्थेबाबत वाटाघाटी सुरु आहेत. .रशियातच का उभारला जातोय युरिया प्रकल्प?रशियात मोठ्या प्रमाणात गॅस आणि अमोनियाचे साठे आहेत. तर भारतात शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खतांची मागणी आहे. याबाबत भारत सध्या जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. यामुळे खतांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी भारताला आयातीवर अवलंबून राहावे लागते. रशियात एक प्रकल्प उभारुन, भारताचा भविष्यातील जागतिक किमतीच्या परिणामाची जोखीम कमी करण्याचा आणि पुरवठ्यातील चिंता दूर करण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः जागतिक स्तरावरील व्यापार निर्बंध आणि युद्धांच्या परिस्थितीमुळे खत पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी, टंचाई निर्माण होऊन दर वाढले आहेत..चीनने युरिया आणि विशिष्ट खतांची निर्यात थांबवल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात खतांचा तीव्र टंचाई निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भारताने रशियात युरिया प्रकल्प सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे..हिंदुस्तान उर्वरक अँड रसायन लिमिटेड (HURL), चंबळ फर्टिलायझर्स अँड केमिकल्स, मॅटिक्स फर्टिलायझर्स अँड केमिकल्स आणि रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड (RFCL) यांच्या सहा नवीन प्लांटमुळे देशातील युरिया उत्पादन आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ३१.४ दशलक्ष टनांवर पोहोचले. .दरम्यान, आसाममध्ये १०,६०१ कोटी रुपये खर्चाच्या नवीन युरिया प्लांटला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.