Animal Fodder: लसुणघास हा अत्यंत पौष्टिक आणि उत्पादनक्षम चारा आहे. तो जनावरांच्या आरोग्यासाठी लाभदायक असून दुधाचे उत्पादन वाढवतो. योग्य बियाणे, चांगली मशागत आणि योग्य खत व्यवस्थापन केल्यास हे पीक तीन वर्षेपर्यंत चांगले उत्पन्न देते..लसुणघास हे एक बहुवार्षिक व्दिदलवर्गीय हिरवे चारा पीक आहे. बहुवार्षिक म्हणजे तीन वर्षे टिकणारे चारा पीक. या चाऱ्यामध्ये प्रथिने, तसेच ‘अ’ आणि ‘ड’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. लसुणघासामुळे जनावरांची भूक वाढते, पचनक्रिया सुधारते आणि शरीराची झीज भरून निघते. तसेच हाडांची योग्य वाढ होते आणि दुधाचे उत्पादन वाढण्यास मदत मिळते. हिरव्या चाऱ्यामध्ये साधारणपणे १९ ते २२ टक्के प्रथिने आढळतात, त्यामुळे हा चारा पशुपालनासाठी अत्यंत पौष्टिक मानला जातो..Rabi Fodder Crop: ज्वारीचे चारा पीक म्हणजे कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे फायदेशीर पीक!.जमिनीची निवड आणि तयारीया पिकासाठी मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. लसुणघास तीन वर्षांपर्यंत टिकतो, त्यामुळे पिकासाठी जमिनीची योग्य मशागत करणे आवश्यक असते. तसेच पेरणीपूर्वी जमिनीत प्रति हेक्टर १० टन शेणखत मिसळावे. त्यानंतर एक खोल नांगरट करून दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात, जेणेकरून जमीन भुसभुशीत आणि पेरणीयोग्य बनेल..बियाण्यांची निवड आणि प्रक्रियापेरणीसाठी नेहमी खात्रीशीर, शुद्ध आणि जातीवंत बियाणे वापरावे. काही वेळा बियाण्यांमध्ये अमरवेल या परोपजीवी वनस्पतींची बी मिसळलेली असते, त्यामुळे बियाणे नेहमी विश्वसनीय ठिकाणाहून किंवा व्यक्तीकडूनच खरेदी करावे.महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शिफारसीनुसार लसुणघासाच्या पेरणीसाठी आर.एल. ८८ आणि आनंद-३ या सुधारीत जातींची निवड करावी. तर पेरणीसाठी प्रति हेक्टर २५ किलो बियाणे पुरेसे असते. पेरणीपूर्वी दहा किलो बियाण्यांसाठी २५० ग्रॅम या प्रमाणात रायझोबियम जिवाणू संवर्धक वापरून बीज प्रक्रिया करावी..पेरणी आणि खत व्यवस्थापनलसूणघासच्या पेरणीसाठी जमिनीचा उतार पाहून पाणी समान प्रमाणात देता येईल असे वाफे तयार करावेत. प्रत्येक वाफ्यामध्ये ३० सें.मी. अंतरावर ओळी पाडाव्यात. प्रत्येक हेक्टरला ४३.५ किलो युरिया, १७३ किलो DAP डायअमोनियम फॉस्फेट किंवा ५०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ६७ किलो MOP म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. याव्यतिरीक्त जर मिश्रखतांचा वापर करणार असाल तर २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश हे प्रमाण साधण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यानंतर आखलेल्या ओळींमध्ये चिमटीने बी पेरून हाताने हलकेच मातीने झाकावे. काही शेतकरी बी फेकून पेरणी करतात, त्यामुळे बियाण्याचा अपव्यय होतो. चिमटीने पेरणी केल्यास बी समान अंतरावर राहते आणि उत्पादन चांगले मिळते.प्रत्येक चारा कापणीनंतर ४३.५ किलो नत्र आणि १०० किलो डी.ए.पी. खत प्रति हेक्टर द्यावे. बी पेरल्यानंतर पहिले पाणी हळुवार द्यावे. हे बहुवार्षिक पीक असल्यामुळे प्रत्येक कापणीनंतर खुरपणी करणे गरजेचे असते..कीड नियंत्रणलसुणघासाच्या बीज उत्पादनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पिकाच्या फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत फुले आणि शेंगा खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसताच उपाय करावेत. यामध्ये एच.ए.एन.पी.व्ही. हे १० मिली औषध १० लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळी फवारणी करावी. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.