Animal Care: हिवाळा हा संकरित गाईंसाठी फायदेशीर काळ असतो, पण थंडी, ओलावा आणि आहारातील बदल यामुळे आरोग्याच्या काही अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठी योग्य गोठा व्यवस्थापन, संतुलित आहार आणि नियमित काळजी घेऊन शेतकरी गायींचे आरोग्य राखू शकतात शिवाय दूध उत्पादनही वाढ मिळवू शकतात..प्रजननाची काळजी हिवाळ्यात गाय आणि म्हशींची प्रजननक्षमता जास्त असते. या काळात संकरित गायी माजावर येतात म्हणजेच heat(हीट) वर येतात. गायांचा माज ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. तो ओळखण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी जनावरांचे निरीक्षण करावे. यामध्ये गाई बळस देत आहे का, सोट टाकत आहेत का किंवा अस्वस्थ वागत आहेत का याकडे लक्ष द्यावे. गाय माजावर आल्यावर योग्य वेळी कृत्रिमरीत्या रेतन म्हणजेच आर्टिफिशयल इन्सिमिनेश करावे. प्रजनन व्यवस्थित झाल्यास पुढे चांगले वासरू आणि दूध उत्पादन मिळते..Hybrid Cow Nutrition: संकरित गाईंच्या आहाराने दूध उत्पादन वाढवा, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सल्ला.वासरांची काळजी वासरांना पाजले जाणारे दूध ३७°C ते ४०डिग्री सेल्सियस तापमानाचे असावे. थंड दूध दिल्यास त्यांना हगवण होऊ शकते. वासरांची जागा कोरडी ठेवावी आणि गवत किंवा बारदान अंथरावे. रात्री वासरांना बंदिस्त, उबदार जागेत ठेवावे. नियमित लसीकरण व आरोग्य तपासणी करावी..आहार आणि पाणी नियोजन थंडीमध्ये जनावरांच्या शरीराला जास्त ऊर्जा लागते. त्यामुळे जनावरे नेहमीपेक्षा १० ते २०% जास्त चारा खातात. दुपारनंतर किंवा संध्याकाळी ऊर्जायुक्त खाद्य जसे की मका १ किलो, बायपास फॅट १०० ग्रॅम द्यावे. जास्त थंडी असल्यास खाद्य अचानक बदलू नये, हळूहळू बदल करावा. चारा उत्तम दर्जाचा, हिरवा आणि पौष्टिक असावा. जास्त प्रथिनयुक्त आहार देऊ नये. त्यामुळे ऍसिडोसिस होऊन दूध उत्पादन कमी होऊ शकते..गोठा व्यवस्थापनगोठा हवेशीर पण थंड वार्यापासून संरक्षित असावा. रात्री आणि पहाटे जनावरांना आत ठेवा. थंडीपासून बचावासाठी गोठ्यात कोरडा पेंडा किंवा गवत अंथरावे. गरज असल्यास शेकोटी करावी, पण धूर बाहेर जाण्याची सोय असावी. रात्री गोठ्यात बल्ब चालू ठेवावा म्हणजे तापमान स्थिर राहते. गोठ्याचा मजला निसरडा नसावा तसेच तो नेहमी कोरडा व स्वच्छ ठेवावा. दिवसा हवा खेळती ठेवावी आणि ओलावा बाहेर जाण्याची सोय असावी..थंडीचे परिणाम आणि काळजीथंड हवामानामुळे काहीवेळा संकरित गाईंना सर्दी, डोळ्यातून किंवा नाकातून पाणी येणे, भूक कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात. यासाठी उपाय म्हणून जनावरांचे जंत निर्मूलन करावे. गोठ्यात स्वच्छता ठेवावी आणि वेळोवेळी जंतूनाशक फवारणी करावी. थंड हवेमुळे शरीरावर तडे, जखमा होऊ शकतात. यासाठी खाद्यात खनिजांचे मिश्रण आणि चिलेटेड झिंकचा वापर करावा. तसेच दूध काढण्यापूर्वी सडांना कोमट पाण्याने धुवावे आणि नंतर ग्लिसरीन, आयोडीन, पाणी हे १:१:१ या प्रमाणात मिश्रण लावावे. .खुरांची काळजी गोठ्यात ओलावा किंवा चिखल असल्यास खुरांमध्ये जखमा होतात. अशा जखमांमुळे दूध उत्पादन आणि जनावरांचे आरोग्य बिघडते. म्हणून गोठा नेहमी कोरडा आणि स्वच्छ ठेवावा. खुरांची नियमित स्वच्छता करावी आणि त्रास दिसल्यास लगेच उपचार करावे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.