Input and Quality Control Department : ‘गुणनियंत्रण’च्या एकाच पदावर दोन अधिकाऱ्यांच्या नेमणुका

Appointment Letters Issue : कृषी खात्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागात घुसण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांमधील स्पर्धा आता इतकी शिगेला पोहोचली आहे की एकाच पदावर दोन अधिकाऱ्यांनी मंत्रालयातून नियुक्तीपत्रे आणली आहेत.
Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषी खात्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागात घुसण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांमधील स्पर्धा आता इतकी शिगेला पोहोचली आहे की एकाच पदावर दोन अधिकाऱ्यांनी मंत्रालयातून नियुक्तीपत्रे आणली आहेत. हा गोंधळ पाहून आता कृषी आयुक्तालय चक्रावले आहे.

गुणनियंत्रण विभागातील मलईदार पदे मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांमधील रस्सीखेच आता नवा विषय राहिलेला नाही. परंतु, आता एकाच पदासाठी दोन-दोन अधिकाऱ्यांना नेमणुका मिळू लागल्यामुळे या पदावर नेमके कोणाला बसवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रण विभागाचा कृषी अधिकारी होण्यासाठी दर वर्षी घोडेबाजार होत असतो.

Department Of Agriculture
Results of Court Case : गुणनियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई

या पदावर नियुक्तीसाठी धनंजय दिनकर पाटील यांची व्यूहरचना केली होती. ते सध्या सोलापूरच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात गुण नियंत्रण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. श्री.पाटील यांची पुण्याच्या गुणनियंत्रण अधिकारीपदी बदली करण्याचे आदेश कृषी खात्याचे अवर सचिव प्रशांत पिंपळे यांनी काढले आहेत.

तर, दुसऱ्या बाजूला याच पदावर विलास बापूराव धायगुडे यांनीही दावा सांगितला आहे. ते सध्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनीदेखील मंत्रालयातून बदलीचा आदेश मिळवला आहे. विशेष म्हणजे या आदेशावरदेखील अवर सचिव श्री. पिंपळे यांचीच स्वाक्षरी आहे.

Department Of Agriculture
Input and Quality Control Department : ‘गुणनियंत्रण’ संचालकपदाच्या निवडीवरून रस्सीखेच

कृषी आयुक्तालयाला मंत्रालयातून पाठवलेल्या आदेशात श्री. पाटील व श्री. पिंपळे यांना बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्याचे सूचित केले आहे. या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तांनी राज्य शासनाला पाठवावा, असेही या आदेशात नमूद केले आहे. परंतु, यातील नेमक्या कोणत्या अधिकाऱ्याला गुणनियंत्रण अधिकारी म्हणून कायम ठेवायचे याबाबत आता पेच तयार झाला आहे.

पाटील यांच्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करणार

पुण्याच्या गुणनियंत्रण अधिकारी पदावर दोन अधिकाऱ्यांनी दावा सांगितल्यानंतर कृषी आयुक्तालयाने विलास धायगुडे यांची नेमणूक अधिकृत ठरविली आहे. धनंजय पाटील यांच्याकडेही याच पदावर नियुक्तीचा आदेश आहे. त्याबाबत आयुक्तालय आता राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे आस्थापना विभागातील वरिष्ठांकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com