Education Matters Agrowon
ॲग्रो विशेष

Education Matters: शिक्षणातील गुंतवणूक म्हणजे उज्ज्वल भविष्याची पायाभरणी

Back To School: गडचिरोली जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव साजरा करताना राज्याचे सहपालकमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं. शिक्षण हे उज्वल भविष्याच्या पायाभरणीसाठीची सर्वोत्तम गुंतवणूक असल्याचे ते म्हणाले.

Team Agrowon

Gadchiroli: ‘‘शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक ही उद्याचे भविष्य निर्माण करणारी गुंतवणूक आहे. यासाठी शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचवणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी केले.

सोमवारी (ता. २३) शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सहपालकमंत्री जयस्वाल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुरखळा येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभागी झाले होते. शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, मुरखळा ग्रामपंचायतीचे सरपंच दशरथ चांदेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश चौधरी, मुख्याध्यापक दौलत घोडाम, शिक्षक शैलेश खंगारे, प्रकाश मुद्दमवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून त्यांचे शाळेत आगमन उत्सवमय पद्धतीने पार पडले. त्यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संचांचे वाटप केले आणि उपस्थित पालक, शिक्षक व ग्रामस्थांसोबत संवाद साधला.

या वेळी अॅड. जयस्वाल म्हणाले, की शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. आज मी तुमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आलो आहे. हे दृश्य पाहून मलाही माझ्या शाळेतील पहिल्या दिवसाची आठवण झाली. अभ्यासात मन लावा, शिक्षकांचे मनापासून ऐका आणि आपल्या कुटुंबाचा, गावाचा, जिल्ह्याचा आणि देशाचा अभिमान वाढवा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

देशाची समृद्धता क्षेत्रफळ किंवा लोकसंख्येवर ठरत नाही, तर ती शिक्षित मनुष्यबळावर अवलंबून असते. शिक्षणाच्या बळावरच आज जगभर भारतीय यशस्वी आहेत. शिक्षणाचा पाया जितका मजबूत, तितके विद्यार्थी सक्षम आणि देशाची ताकद म्हणून भविष्यात समोर येतील असे त्यांनी सांगितले.

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी सरकारच्या वतीने सतत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष असून, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, दळणवळण, रोजगार यांसारख्या सर्व क्षेत्रांमध्ये विकास घडवून आणण्यासाठी निधी आणि योजना मंजूर केल्या जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AI In Agriculture : सांगली जिल्हा बँक ‘एआय’साठी देणार अनुदान

Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे

Banana Farming : कांदेबाग केळी पिकासाठी शेणखताची शोधाशोध

Papaya Farming : खानदेशात पपई पीक फळकाढणीवर

Jal Samadhi Protest : आडोळ खुर्द ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन

SCROLL FOR NEXT