
Parbhani News: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. २५ जूनपर्यंत मुदत असून, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील निम्नस्तर कृषी शिक्षण विद्याशाखेअंतर्गत ५ घटक (शासकीय) अनुदानित, १ घटक (शासकीय) विना अनुदानित तसेच ५१ खासगी विना अनुदानित कृषी तंत्र विद्यालये कार्यरत आहेत.
१९४७ साली परभणी येथे स्थापन कृषी तंत्र विद्यालय सर्वात जुने व उच्च दर्जाचे विद्यालय आहे. कृषी पदविका अभ्यासक्रमातून पीक संवर्धन, संरक्षण, पशू पालन, दुग्ध व्यवसाय, फळे व भाजीपाला उत्पादन, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, पणन व विपणन, प्रात्यक्षिकाद्वारे व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाते.
कृषी पदविकाधारकास कृषी सहायक, ग्रामसेवक, कालवा निरीक्षक, शालेय शिक्षणामध्ये कृषी विषयाचा समावेश झाल्यास कृषी शिक्षक म्हणून शासकीय अथवा खासगी क्षेत्रात सेवेच्या संधी आहेत. कृषी सेवा केंद्र (खाते व बि-बियाणे परवानाधारक) स्वयंम कृषी सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरू करता येईल.
हा दोन वर्षीय मराठी माध्यमातील पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. कमाल वयोमर्यादा ३० वर्ष व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वयाची अट ५ वर्षांनी शिथिलक्षम राहील. माजी सैनिकासाठी ४५ वर्ष. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.-१० वी) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, प्रवेशासाठी इयत्ता १० वी ची मूळ गुणपत्रके.
ऑनलाइन अर्ज व तात्पुरते प्रवेश पत्र, विद्यालय, शाळा सोडल्याचा मूळ दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, १२ टक्के गुणांचा अभिभार मिळण्यासाठी ७/१२, शेतकरी किंवा भूमिहीन शेतमजूर असल्या बाबतचे सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र (अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता), उन्नत गट प्रमाणपत्र (नॉन क्रिमीलेअर) आदी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
प्रवेशासाठी येथे करा अर्ज
कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश माहिती पुस्तिका प्रवेश अर्जासह http://wnmkv.agridiplomaadmission.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परभणी येथील कृषी तंत्र विद्यालयात प्रवेशाकरिता कोड क्र. ४३२२३४ हा असून, संपर्क क्रमांक ९९६०४२२८६६ व ९४०४७४३९३७ करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष पिल्लेवाड यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.