Sangli News : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या लगत कर्नाटक सीमा आहे. इथल्या कारखान्याच्या क्षेत्रातील ऊस कर्नाटकात पाठवला जातो. परंतु ही बाब गंभीर असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे नियोजन आहे. या बैठकीत यासंबंधी तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी दिली..कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यातर्फे गुरुवारी (ता. ४) कार्यक्षेत्रातील विक्रमी ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. सालीमठ बोलत होते. .या वेळी कारखान्याच्या सभासदांना शेअर्स सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रादेशिक सहसंचालक संगीता डोंगरे, उपसहसंचालक गोपाळ मावळे, कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, उपाध्यक्ष दिगंबर पाटील, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे, ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..Sugarcane Crushing Season : कर्नाटकचा ‘ऊस’ चोरण्याचा डाव.श्री. सालीमठ म्हणाले, की ‘क्रांतिअग्रणी’च्या ऊस विकास विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीने कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले आहे. वेगवेगळे शेतीपयोगी उपक्रम राबवून एकरी विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी इतरही शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची भूमिका घेतली पाहिजे. .त्यासाठी कारखान्याकडून विशेष चर्चासत्राचे आयोजन करावे. प्रगतिपथावर असलेल्या व शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्या कारखान्याच्या पाठीशी साखर आयुक्त या नात्याने उभा असेन. आमदार अरुण लाड म्हणाले, की एकरी सरासरी २६ टन उसाचे उत्पादन आता ४६ टन झाले आहे. ऊस विकास विभागातून शेतकऱ्यांना मापक दारात बियाणे व खतपुरवठा करण्यात येतो. .Sugarcane Crushing : विनापरवाना गाळप केल्यास साखर कारखान्यांवर कारवाई.अलीकडच्या काळात मनुष्यबळ कमी झाले असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर करण्यासाठी शेतीची विविध उपकरणे विकसित करण्याकडे आमचा भर राहिला आहे. सरासरी ४६ टनांपासून १५० टनांच्या मधल्या शेतकऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल..कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड म्हणाले, की शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊसविकास योजनेची सुरुवात केली. त्यामध्ये पाणी, माती, देठ परीक्षण केंद्र उभारले आहे. यांत्रिकीकरण यासह उत्पादनवाढीच्या तंत्राचा वापर शेतकरी करत आहे. शेतीत ठिबक सिंचन, निचारा प्रणाली, सेंद्रिय खते, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.