Dharashiv News : शन दुकानांमधून दरमहा स्वस्त धान्य घेणाऱ्या जिल्ह्यातील २ लाख ८७ हजार ३५५ लाभार्थ्यांना स्वस्त धान्यास मुकावे लागण्याची शक्यता आहे. शासनाने ई-केवायसी बंधनकारक करीत वारंवार मुदतवाढ देऊनही या लाभार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. रेशन दुकानात जाऊन लवकर ई-केवायसी न केल्यास त्यांचा धान्य पुरवठा रोखला जाणार आहे. .राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत पारदर्शकता यावी, यासाठी सरकारने स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थींसाठी ई-केवायसी बंधनकार केलेली आहे. रेशनकार्डला आधारकार्ड जोडणे गरजेचे आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीला स्वस्त धान्याचा लाभ मिळावा, हा या ई-केवायसीचा उद्देश आहे. .Ration Card e-KYC : ई-केवायसीची प्रक्रिया संथ गतीने.रेशनकार्डवर नाव असणाऱ्या प्रत्येक लाभार्थीने रेशन दुकानदाराकडे जाऊन आपल्या आधारकार्डची झेरॉक्स सादर करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने वेळोवेळी मुदत वाढवून दिली. सप्टेंबर महिना उजाडला तरी अजून २ लाख ८७ हजार लाभार्थ्यांचे ई- केवायसी करणे बाकी आहे. यापुढे ई-केवायसी झालेल्या लाभार्थ्यांनाच धान्य मंजूर होण्याची शक्यता आहे..जिल्ह्यात एकूण एक हजार ७८ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. तर २ लाख ६६ हजार ५४१ शिधापत्रिकाधारक असून ११ लाख ८९ हजार २९८ लाभार्थी आहेत. यापैकी ८ लाख ६ हजार ३३० म्हणजे ७५.९० टक्के लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. .Amaravati Ration Ban " अमरावतीत ३९ हजार आयकर दात्यांचे रेशनवरील धान्य बंद.तर २ लाख ८७ हजार ३५५ अर्थात २४.१० टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी बाकी आहे. या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी न केल्यास त्यांचा धान्य पुरवठा रोखला जाऊ शकतो, अशा सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत..ॲपसह रेशन दुकानात सुविधाशासनाच्या ऑपवर किंवा स्वस्त धान्य दुकानात ई-केवायसी करण्याची सुविधा आहे. ज्या लाभार्थीनी ई-केवायसी केले नाही. त्यांचे धान्य यापुढे बंद करण्यात येणार आहे. ई-केवायसीसाठी आधारकार्डची गरज असून, आध- अरकार्ड शिधापत्रिकेला लिंक असणे गरजेचे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.