Pune News : देशातील सर्वांत मोठ्या असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे बाजार आवारात दुर्गंधी पसरली असून, रोगराईचे सावट पसरले आहे. याचा फटका शेतकरी, आडतदार, ग्राहक, खरेदीदार यांना बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. .यासर्व बाबींची माहिती घेत पणन संचालक तथा प्रशासक विकास रसाळ यांनी बाजार आवाराची पाहणी करत, सचिव, आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरत कान टोचले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये कचरा संकलन आणि विल्हेवाटीसाठी कोट्यवधी रुपयांची कंत्राटे वर्षानुवर्षे दिली जात आहेत. मात्र त्या तुलनेत स्वच्छता आणि आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बाजार घटक सातत्याने करत आहेत. .Mumbai APMC: मंबई बाजार समितीवर अखेर प्रशासक.नुकतीच बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपली आणि प्रशासक म्हणून पणन संचालक विकास रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती झाल्यानंतर रसाळ यांनी नुकतीच बाजार आवाराची पाहणी केली. .या पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी सडलेल्या कांदा, बटाटा, भाजीपाल्याचे ढीग ठिकठिकाणी आढळले. या ढिगांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती. तर रोगराईचे सावट पसरले होते. याबाबत रसाळ यांनी आरोग्य अधिकारी, कचरा विभागाचे अधिकारी यांनी धारेवर धरत तातडीने स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या..Mumbai APMC: मुंबई बाजार समितीमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊ नका: उच्च न्यायालय.दरम्यान, कचऱ्याचा प्रश्न नियमित असून, संचालक मंडळ केवळ कोट्यवधी रुपयांचे ठेके देतात मात्र त्यातुलनेत स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बाजार घटकांनी केला आहे. तर नुकतेच नालेसफाईमधील मोठ्या घोटाळ्याची चर्चा समोर आली होती. पावसाळ्यामध्ये सातत्याने नाले तुंबून मोठ्याप्रमाणावर बाजार आवारात आले होते. या वेळीदेखील सांडपाण्याने बाजार आवार बुडून गेला होता. या वेळी मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये फळे भाजीपाला भिजून नुकसान झाले होते..प्रशासकांपुढे आवारासह प्रशासनातील स्वच्छतेचे आव्हानप्रशासक विकास रसाळ यांच्यापुढे बाजार आवारातील स्वच्छतेबरोबरच, प्रशासनातील स्वच्छतेचे आव्हान उभे ठाकले आहे. प्रशासनातदेखील अनेक अधिकारी एका विशिष्ठ जागी वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत. त्यांची झाडाझडती आणि बदल्यांचे मोठे आव्हान आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.