Nanded News : जिल्ह्यात नुकताच मोठा पाऊस होऊन अनेक भागातील पिके पाण्याखाली गेली. त्यानंतर काही प्रमाणात शिल्लक राहिलेल्या सोयाबीनच्या पिकावरील शेंगा वाळू जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या मागील संकटाची मालिका संपत नसल्यामुळे शेतकरी निसर्गापुढे हतबल झाले आहेत. .जिल्ह्यात ऑगस्टमध्ये १४ ते १७ तारखेला झालेल्या अतिवृष्टीनंतर पुन्हा ऑगस्टमध्येच २५ ते २७ तारखेदरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यापावसामुळे अनेक भागातील पिके पाण्याखाली गेली. तसेच पुरामुळेही पिके मातीसह खरडून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून पिके गेली आहेत. .उंच भागात पाणी साचत नसल्यामुळे अशा ठिकाणचे सोयाबीन हिरवे दिसत आहे. परंतु याही पिकाला लागलेल्या शेंगा सततच्या पावसामुळे वाळून जात, असल्याचे चित्र सध्या समोर आले आहे. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करून लवकरात लवकर शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत..Soybean Crop Damage : अमरावती जिल्ह्यात पावसाने तीस टक्के सोयाबीन हातचे गेले.जिल्ह्यासह मराठवाड्यात झालेल्या सलग अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. सोयाबीनच्या पिकावर पावसाचा थेट परिणाम होत असून शेंगा झाडावरच वाळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या महिनाभरात अतिवृष्टीमुळे शेतातील जमीन पाणथळ झाली आहे. .सोयाबीन पिकाला पाण्याचा जास्त मारा झाल्याने मुळांचा श्वास गुदमरला असून झाडाची वाढ खुंटली आहे. विशेषतः फुलोऱ्यानंतर लागलेल्या शेंगांना पुरेसा पोषणद्रव्य पुरवठा होत नसल्याने शेंगा सुकत आहेत. यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. काही भागांत शेंगांमध्ये दाणे न भरल्याची परिस्थिती दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी खर्च करून योग्य वेळी पेरणी केली होती, त्यांनाही आता मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. .Soybean Crop Damage : सततच्या पावसाने सोयाबीन पीक धोक्यात.जिल्ह्यातील सर्वच १६ तालुक्यांमध्ये सोयाबीन पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, अतिवृष्टीतून शिल्लक राहिलेल्या सोयाबीनच्या शेंगा झाडावरच वाळल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन जवळपास ४० ते ६० टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे. .याशिवाय बाजारात कमी दर्जाच्या धान्याला दरही कमी मिळणार असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. शेतकरी संघटनांसह सामाजिक संघटनांनी तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्य सरकारने आणि प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी सर्व स्तरातून अपेक्षा व्यक्त होत आहे..सततचा पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे पिकांना अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होवून पिके पिवळी पडणे, वाढ खुंटणे आदी बाबी घटतात. यामुळे पिके जरी हिरवी दिसत असलीतरी उत्पादनात मात्र घट येते. या परिस्थितीला भोतीक नुकसान म्हणता येईल.- दत्तकुमार कळसाईत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड..मागच्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हाताशी आलेल्या सोयाबीनच्या शेंगा झाडावरच वाळत आहेत. यामुळे अतिवृष्टीतून शिल्लक राहिलेले सोयाबीनही हातून गेल्यात जमा आहे.- गंगाधर हाळे, शेतकरी, समराळ, ता. धर्माबाद, जि. नांदेड..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.