Orange Crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Crop Management : संत्रा पिकात एकात्मिक अन्नद्रव्याचे व्यवस्थापन गरजेचे

Integrated Nutrient Management : सध्याची परिस्थिती पाहता संत्रा पिकात काटेकोर पद्धतीने ओलित व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी केले.

Team Agrowon

Washim News : सध्याची परिस्थिती पाहता संत्रा पिकात काटेकोर पद्धतीने ओलित व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी केले. यंदा मानोरा तालुक्यात बदलत्या हवामानामुळे व उन्हाळ्यातील अवकाळी पावसामुळे बहुतांश संत्रा बागामध्ये मृग बहार घेण्यास शेतकरी अयशस्वी राहिले.

पुढील वर्षी येणाऱ्या संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी संत्रा शेती शाळेच्या माध्यमातून एकात्मिक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. याच अनुषंगाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्राद्वारे संत्रा फळपिकावरील पाचवी शेती शाळा मौजे सोयजणा येथील प्रगतिशील शेतकरी प्रदीप मिसाळ यांच्या शेतात घेण्यात आली.

यावेळी कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्ती पाटील बोलत होते. शेतीशाळेच्या पहिल्या सत्रात शेतकऱ्यांच्या शेतात संत्रा पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून निरीक्षणे नोंदविण्यात आली. यामध्ये ग्रेसी स्पॉट व डिंक्या व नागअळीची लक्षणे तसेच अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आली.

तांत्रिक सत्रात निवृत्ती पाटील यांनी संत्रा पिकात सद्यःस्थितीत प्रामुख्याने पिवळेपणाची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे सांगत, याचे मुख्य कारण हे ग्रेसी स्पॉट रोग आणि मूळसड असून या सोबतच पाण्याचा ताण आणि अन्नद्रव्यांची कमतरता ही कारणे आहेत.

यासाठी संत्रा बागायतदारांनी गरजेनुसार नियमित ओलीत करावे आणि सोबतच शिफारशीत नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा जमिनीतून आणि फवारणीद्वारे द्यावी. प्रदीप मिसाळ यांनी उत्पादन तंत्राची माहिती दिली. विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. आभार गोपाल पाटील म्हातारमारे यांनी मानले. बल्लू पाटील, निखिल मिसाळ, उग्रेश्वर राठोड व सोयजणा येथील संत्रा बागायतदारांनी कार्यशाळेसाठी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT