Orange Processing Unit : नागपूरसह पाच ठिकाणी संत्रा प्रक्रिया केंद्रे

Food Processing Unit : नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावतीतील मोर्शी आणि बुलडाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे स्थापन करण्याच्या योजनेस बुधवारी (ता. ८) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
Orange
OrangeAgrowon

Vidarbha News : नागपूर, काटोल, कळमेश्वर,  अमरावतीतील मोर्शी आणि बुलडाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे स्थापन करण्याच्या योजनेस बुधवारी (ता. ८) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

यासाठी ३९ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दोन वर्षांसाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेत तीन प्रकारचे प्रकल्प उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Orange
Orange Export : बांग्लादेशचे दरवाजे बंद झाल्यानंतर वैदर्भीय संत्र्याला मिळाले नवे मार्केट

विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांत संत्रा फळाचे काढणीपश्चात हाताळणी नुकसान २५ ते ३० टक्के आहे. राज्यात संत्र्यांवर प्रक्रिया करण्याचे प्रमाण नगण्य असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते.

त्यामुळे काढणीपश्चात प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी सरकारकडून वित्तीय सहाय्य उबलब्ध  करून देणे आणि संत्र्याचे काढणीपश्चात नुकसान कमी होऊन संत्रा उत्पादकांना योग्य भाव मिळण्यासाठी संत्र्यांचे मूल्यवर्धन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची अर्थसंकल्पात घोषणा केली होती. त्यानुसार नागपूर, काटोल, कळमेश्वर, मोर्शी आणि बुलडाणा येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यास मान्यता देण्यात देण्यात आली आहे.

Orange
Orange rate : सरकारमुळं संत्रा रस्त्यावर फेकण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ | ॲग्रोवन

या योजनेसाठी सहकारी प्रक्रिया संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी उत्पन्न बाजार  समिती आणि खासगी उद्योजक पात्र ठरणार आहेत. या योजनेअंतर्गत प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प, दुय्यम प्रक्रिया प्रकल्प, उपपदार्थांवरील प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पाांसाठी छोटे पॅकहाउस, २.५ टन क्षमतेचे लहान क्षमतेचे प्रीकूलिंग व २५ टन क्षमतेचे शीतग्रह सार्टिंग ग्रेडिंग व वॅक्सिंग लाइन याचा समावेश असेल या प्रकल्पाची किंमत ४ कोटींच्या मर्यादेत राहील.

दुय्यम प्रक्रिया प्रकल्पात संत्रा आरटीसी तयार करणे, तसेच प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पासाठी संलग्न म्हणून काम करणे असे स्वरूप असेल. ही मर्यादा ४० लाखांच्या मर्यादेत असेल.

या योजनेसाठी देण्यात येणारे अर्थसाह्य अनुदान स्वरूपात असेल. लाभार्थ्यांचा १५ टक्के स्वनिधी आवश्यक असेल. तसेच आवश्यकतेनुसार ८५ टक्के अर्थसाह्य बँकेडून कर्ज स्वरूपात मंजूर करून घ्यावे लागणार आहे.

या योजनेतून नागपूर, काटोल, कळमेश्वरसाठी प्रत्येक १ तर अमरावतीतील मोर्शीत तीन आणि बुलडाण्यात २ अशी एकूण आठ केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तर पाचही ठिकाणी प्रत्येकी एक उपपदार्थ प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com