Orange Orchard : संत्रा बागेत अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर

Orange Production : चांदूरबाजार तालुक्‍यातील ब्राम्हणवाडा थडी, शिरसगाव, करजगाव हा भाग संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने येथील भौगोलिक स्थिती संत्रा उत्पादनाकरिता पोषक आहे.
Orange Plantation
Orange PlantationAgrowon

सूर्यभान वऱ्हाडे

Orange Plantation : चांदूरबाजार तालुक्‍यातील ब्राम्हणवाडा थडी, शिरसगाव, करजगाव हा भाग संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने येथील भौगोलिक स्थिती संत्रा उत्पादनाकरिता पोषक आहे. सूर्यभान यांचे आजोबा सुरुवातीला परंपरागत मासेमारीचा व्यवसाय करीत होते. कुटुंबाची शेती नसल्याने २० वर्षांपूर्वी करारावर पद्धतीने शेती करायचे. साधारण दहा एकरांवर कापसाची लागवड केली जायची.

त्यावेळी मजुरी कमी होती, तसेच कापसाला दर चांगला मिळायचा त्यामुळे शेती फायदेशीर ठरत होती. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर हळूहळू शेतजमीन खरेदी करत गेले. अशा पद्धतीने आठ एकर शेती विकत घेतली. या क्षेत्रात कपाशी लागवडीवर भर होता. परंतु, कालांतराने मजुरी दरांत वाढ, कापसाला मिळणारा कमी दर यामुळे कापूस लागवड परवडत नव्हती. त्यामुळे त्यांनी कपाशी लागवड थांबवून संत्रा लागवड करण्याचा निर्णय घेतला.

संत्रा लागवड :

संत्रा लागवड करण्यापूर्वी शेंदूरजना घाट तसेच इतर भागांतील संत्रा बागांची पाहणी केली. संत्रा उत्पादकांकडून बाग व्यवस्थापन तंत्र समजावून घेतले. त्यानंतर २००९ मध्ये संत्रा लागवड करण्यात आली.
लागवड साधारण १८ बाय १८ फूट अंतरावर करण्यात आलेली आहे. त्यासाठी कृषी विभाग अंतर्गत रोजगार हमी योजनेचे अनुदान मिळाले. दोन हेक्‍टर क्षेत्राकरिता ८० हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते.

लागवड केल्यानंतर साधारण सहाव्या वर्षापासून बागेतून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. परंतु उत्पादनक्षम फळे ही नवव्या वर्षापासून मिळतात. सुयोग्य नियोजनाच्या बळावर गेल्या पाच वर्षांत चांगले आर्थिक उत्पन्न मिळाल्याने त्यांनी आणखी आठ एकर शेती विकत घेतली. त्या क्षेत्रातही संत्रा लागवडीवर भर देण्यात आला आहे.
नव्याने घेतलेल्या जमिनीत २०१९ मध्ये संत्रा लागवड करण्यात आली. संत्रा बाग व्यवस्थापनात सूर्यभान यांना चांदूरबाजार येथे कृषी विभागात कृषी साहाय्यक पदावर कार्यरत असलेला त्यांचा मुलगा दिनेश यांच्याकडूनही तांत्रिक मार्गदर्शन मिळते.

Orange Plantation
Orange Orchard Management : अमरावतीतील बोदड येथील विपुल चौधरी यांचे संत्रा नियोजन

छाटणीमुळे उत्पादकता वाढ :

संत्रा उत्पादनात छाटणीला खूप महत्त्व आहे. ज्या फांदीला फळधारण होते, अशाच फांद्याची छाटणी केली पाहिजे. त्यामुळे पुढील काळात फळ फांद्यांची संख्या वाढते. आणि उत्पादकता वाढीस मदत होते. मजुरी, खत किंवा इतर उत्पादन खर्चावरील बाबींवर मर्यादा राखणे आपल्या हातात नसले तरी सुयोग्य व्यवस्थापनाच्या बळावर फळांचे उत्पादन वाढविणे शक्य आहे. त्यातूनच उत्पादनात वाढ होत असल्याने छाटणी केलीच पाहिजे, असे सूर्यभानराव सांगतात. दरवर्षी बागेत आंबिया बहरातील फळे निघाल्यानंतर बाग ताणावर सोडली जाते. याच काळात १५ डिसेंबरला छाटणी करून त्यानंतर पुढील बहार धरण्यासाठी बागेला २५ डिसेंबरला पाणी दिले जाते.

Orange Plantation
Orange Orchard Management : संत्रा बाग लागवडीचे नियोजन कसे असावे?

अन्नद्रव्य व्यवस्थापन :

आंबिया बहारातील फळ उत्पादन हे वर्षभराचे पीक आहे. त्यामुळे एकदाच खतमात्रा न देता त्याची चार टप्प्यात विभागणी केली जाते. साधारण अर्धा किलोप्रमाणे दोन वेळा खतमात्रा देतो. १०ः२६ः२६, १२ः३२ः१६ यापैकी जे खत उपलब्ध असेल ते खत देण्यावर भर राहतो.
जानेवारी, मार्च, जून, ऑगस्ट असे चार महिन्यात ही खतमात्रा दिली जाते.

संत्रा फळपिकावर विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे नियंत्रणासाठी रासायनिक फवारणीवरील खर्चात मोठी वाढ होते. त्यामुळे उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. त्यासाठी आवश्यकतेनुसार फवारणी करून कीड-रोग नियंत्रणाचा प्रयत्न केला जातो. विशेषतः अन्नद्रव्यांच्या वापरावर अधिक भर दिल्याने झाडे सशक्त होऊन त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे प्रादुर्भाव झाला तरी झाडांवर तितकासा परिणाम दिसून येत नाही.

संत्रा हे खादाड पीक असल्याने त्याला पोषक अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा झाला पाहिजे. त्यामुळेच बागेचा दर्जा राखता आला, असे सूर्यभान वऱ्हाडे सांगतात.
तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर केला जातो. साधारण ऑगस्ट महिन्यापर्यंत तणनाशकाचा बागेत वापर केला जातो. त्यानंतर ग्रासकटरच्या साहाय्याने तण व्यवस्थापन केले जाते.

सिंचन व्यवस्थापन
संपूर्ण बागेत सिंचनासाठी ठिबकचा अवलंब केला आहे. त्यामुळे सुनियोजित पाणी व्यवस्थापन करणे शक्य होते. योग्य पाणी व्यवस्थापनामुळे ३० टक्‍के उत्पादनात वाढ होत असल्याचे त्यांचे निरिक्षण आहे.


आगामी नियोजन :
झाडावरील फळांची काढणी पूर्ण केली जाईल.
संपूर्ण बागेतील फळे निघाल्यानंतर बागेत शिफारशीत घटकांची प्रतिबंधात्मक फवारणी घेतली जाईल. जेणेकरून बुरशीचा प्रादुर्भाव टाळला जाईल.
या काळात बागेतील अतिरिक्त फांद्याची छाटणी केली जाईल. वाळलेल्या, रोगग्रस्त फांद्याची छाटणी केल्यामुळे नवीन फूट चांगली येण्यास मदत होते.
त्यानंतर डिसेंबर महिन्यात बहार धरण्याचे नियोजन केले जाईल.

सूर्यभान वऱ्हाडे, ८२७५३०७५९०
(शब्दांकन ः विनोद इंगोले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com