Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Survey : पुणे जिल्ह्यात पीक नुकसान पंचनाम्यास सुरवात

Crop Damage Survey : गेल्या आठवड्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे.

Team Agrowon

Pune News : गेल्या आठवड्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. गाव पातळीवर कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामे करण्यात येणार आहे. लवकरच नुकसानीचे क्षेत्र समोर येईल.

‘ॲग्रोवन’ने ‘पुणे जिल्ह्यात पावसाचा एक हजार हेक्टरला फटका’ या विषयाचे वृत्त गुरुवारी (ता.२४) प्रसिद्ध केले होते. त्याची दखल कृषी विभागाने घेतली असून पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाने दिल्या आहे. त्याबाबतची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी अॅग्रोवनला दिली.

मॉन्सूनोत्तर पावसाने पुणे जिल्ह्यातील काही भागात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या पावसामुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. ऑक्टोबर महिन्यात जवळपास एक हजार ९४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तुरळक ठिकाणी पंचनामे सुरू झाले असले तरी अनेक ठिकाणी अजूनही पंचनामे सुरू झाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. त्यातच शेतकरी तातडीने पंचनामे करण्याची मागणी जोर धरू लागली होती.

पुणे जिल्ह्यात अधूनमधून होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे खरिपातील पिकांची काढणीने वेग धरला आहे. सोयाबीन, मूग, उडीद या पिकांच्या काढण्या आटोपल्या असल्या तरी तूर, बाजरी पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसात काढण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे.

यंदा खरीप पेरणीच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली असली तरी उशिराने झालेला अतिपाऊस, पावसाचा खंड यामुळे झालेले नुकसानीमुळे उत्पादनात चांगलीच घट येण्याची शक्यता आहे. अचानक होत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. यामध्ये ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानीमध्ये जुन्नरमध्ये दहा गावातील २५० शेतकऱ्यांचे १०८ हेक्टर, तर आंबेगावमधील ४२ गावांतील तीन हजार २१२ शेतकऱ्यांचे ९८६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला, सोयाबीन, मका या पिकांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT