Koyna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam : ‘कोयने’च्या पाणीसाठ्यात दोन ‘टीएमसी’ने वाढ

Dam Water Storage : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवकही वाढली आहे. धरणात २४ तासांत तब्बल २.१८ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

Team Agrowon

Satara News : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवकही वाढली आहे. धरणात २४ तासांत तब्बल २.१८ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

बुधवारी (ता. २) सकाळी आठपर्यंत एकूण २३ व उपयुक्त १७. ८८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात मंगळवारी (ता. १) पावसाचा जोर वाढल्याने पेरणी झालेल्या पिकांना फायदा होणार आहे.

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पश्‍चिम भागात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. महाबळेश्‍वर, सातारा, पाटण व जावळी तालुक्यांत पावसाचा जोर अधिक आहे. कऱ्हाड, वाई तालुक्यांत पाऊस सुरू आहे.

पश्‍चिम भागातील तालुक्याच्या परिसरात शेतात पाणी साचले आहे. ओढ्या, नाले वाहू लागले आहेत. भात लागवडीस वेग आला आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा व कोरेगाव तालुक्यात तुलनेत पाऊस कमी आहे.

कोयना धरण क्षेत्रात १३३, तर नवजा १०२ व महाबळेश्‍वर ४५ येथे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात २१,०५८ क्युसेक पाण्याची आवक आहे. या आवकेमुळे धरणात २.१८ टीएमसी वाढ झाली आहे.

इतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. यामध्ये धोम १३, धोम-बलकवडी २६, कण्हेर २५, उरमोडी १०८, तर तारळी येथे २० मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे याही धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणात २५.१९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT